एक पांढरी पाल
वर वर चढायची …..
मनात माझ्या खोल …
खोल जखम करायची
जखम रक्ताळलेली
चिघळत रहायची …
पालीच्या चुक्चुकण्याने
खपलीहि निघायची
त्या पालीचे सगे सोयरे
करीत मौज जमायचे
स्वार्थाच्या तलवारीने
पंख माझे छाटायचे …..
अपंग मी, गलितगात्र,
वेदनेने विव्हळायचो
पालीच्या छद्मीहास्याने
गुदमरून मरायचो,
आता……..
हुंकार मी भरला आहे
नागफणी बनणार आहे
न्याय हक्क मिळवून माझे,
आकाशी गवसणी घालणार आहे
(हि कविता रविवार सकाळ १९८२ मध्ये प्रसिद्ध झाली होती)
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
Leave a Reply