नवीन लेखन...

शिनकानसेन – जमिनीवरचे विमान

जलद धावणारे गतिमान वाहन म्हणजे बुलेट ट्रेन… जगातल्या बऱ्याच प्रगत देशांमध्ये कमीत कमी वेळात दुरवर धावणाऱ्या ह्या बुलेट ट्रेनचे जाळे पसरलेले आहे.
बुलेट ट्रेनचे जपानी भाषेतले नाव शिनकानसेन. जपानला एकत्र बांधून ठेवणार्‍या प्रमुख धाग्यांमधील एक..
एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतचा प्रवास काही तासात घडवून आणणारी जगातली सर्वात वेगवान रेल्वे -शिनकानसेन.
“खरोखरच…जमिनीवर धावणारी विमाने आहेत!” असं म्हंटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही अशा डौलाने ह्या शिनकानसेन धावतात.
३०० किमी प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने! म्हणजे कल्पना करा किती स्पीड असेल (मुंबई-पुणे प्रवास ६० मिनिटांच्या आत पूर्ण करतील इतका).
ह्या गाड्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जपानला शोभेल असच असणारं वेळेचं गणित. अचूक दिलेल्या वेळेत गाडी समोर हजर! ह्या गोष्टींचं नेहमीच अतिशय आश्चर्य वाटते.
फार क्वचित एखादी शिनकानसेन लेट होते ते सुद्धा फक्त एखाद्या मिनिटाच्या फरकाने. शिनकानसेन मध्ये बसल्या नंतर लगेचच एक अनाउन्समेंट ऐकायला येते ज्यामध्ये प्रत्येक स्थानकावर पोचण्याची वेळ अचूक सांगितली जाते.

जपानचं एक वैशिट्य म्हणजे एखादी ट्रेन काही कारणांमुळे उशिराने धावत असल्यास  इतर सर्व ट्रेन लाइन्स मध्ये त्या बद्दलची सूचना/अलर्ट देतात.

रेल्वे हे प्रामुख्याने वापरले जाणारे वाहन असल्याने एखादी ट्रेन लेट झाल्यास नागरीकांचा खोळंबा होऊ नये ह्याकरिता ही आगाऊ सूचना दिली जाते.
मेट्रो ट्रेन्स पासून शिनकानसेन पर्यंत सगळ्या गाड्यांमध्ये डिजिटल स्क्रीन असते ज्यावर रेल्वे प्रवासात लागणारी सगळी माहिती डिस्प्ले केली जाते.  विविध प्रकारच्या खाजगी व सरकारी ट्रेन लाइन सर्वात जास्त प्रमाणात तोक्यो मध्ये असल्यानेहे नक्कीच अनुभवता येते.

तर ह्या शिनकानसेनचे डिझाइन (एक्सटिरिअर, इंटिरिअर) म्हणाल तर ते सुद्धा अप्रतिम! इंजिन शिनकानसेनच्या दोन्ही साईडना असते जिथे गाडीचा पुढील भाग निमुळता होत जातो. 
मध्यंतरी कुठे तरी वाचनात आलं त्यानुसारशिनकानसेनचे डिझाइन किंगफिशर (खंड्यापक्ष्याच्या  आकृती वरून प्रेरित आहे. 
साधारण १९७८ साला दरम्यान पहिली बुलेट ट्रेन जपान मध्ये धावली. त्यानंतर अनेक बदल होत होत बरयाच गाड्या येत राहिल्या.
जपान रेल्वेच्या (JR) ईस्ट, वेस्ट आणि सेंट्रल अशा रेल्वे कंपन्यांच्या अनेक शिनकानसेन प्रसिद्ध आहेत. लहान मुले ते मोठी माणसे सगळ्यांमध्ये एक विशिष्ट क्रेझ दिसून येते. रंग व रचना पाहून शिनकानसेन ओळखणे हा एक जणु त्यांचा छंद आहे. 
 
जपानच्या दक्षिणेकडे घेऊन जाणाऱ्या ट्रेन्स मधील, सध्या सगळ्यात फास्ट शिनकानसेन आहे नोझोमी. ह्या गाड्या इतर शिनकानसेनहून अधिक वेगाने धावतात. जपानला आल्यास नोझोमी गाड्यांची सफारी नक्कीच करायला हवी. त्या खालोखाल आहेत हिकारी व कोदामा ट्रेन्स.
शिनकानसेन व काही मेट्रो ट्रेन मध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे प्रत्येक स्टेशन घेणारी गाडी आणि दुसरी म्हणजे मार्गावरची मुख्य स्टेशन्स घेणारी गाडी.
जपानच्या उत्तरेकडे धावणाऱ्या शिनकानसेन मध्येपण अनेक प्रकार दिसतात. हायातेत्सुबासाहायाबुसातोहोकू इत्यादीह्यातली एक तोकीमॅक्स नावाची ट्रेन डबल डेकर आहे.
जपानच्या काही रेल्वे गाड्यांमध्ये आणि शिनकानसेन मध्ये देखील एक ग्रीन क्लास नावाचा प्रकार असतो ज्याला आपण फर्स्ट क्लास म्हणू, त्याचं तिकीट इतर डब्यांपेक्षा वेगळं विकलं जात आणि अर्थातच महाग असतं. ह्या गाड्यांचे काही डबे रिझर्व्ह असतात तर काही डबे विना रिझर्वेशन वापरता येतात.
जपानच्या उत्तरेकडे धावणाऱ्या दोन वेगवेगळ्या जागी जाणाऱ्या बऱयाच शिनकानसेनतोक्यो स्टेशन वरून निघताना एकत्र-एक ट्रेन होऊन प्रवास करतात. पुढे गेल्यानंतर त्यांचे मार्ग वेगवेगळे होतात.
 
प्रत्येक माणसाला त्याच्या इच्छित स्थळी पोहोचताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये याची संपूर्ण दखल घेऊन ह्या सगळ्याची माहिती वारंवार  प्रवाशांना सांगितली जाते. 
शिनकानसेन इतक्या वेगाने धावत असताना सुद्धा आत बसलेल्या व्यक्तीला कसलीच गैरसोय होत नाही. निवांत चहाकॉफी पिता येते किंवा अगदी  PC वर काम सुद्धा करता येत. शिनकानसेन वेगाने ट्रॅक वरून धावताना कोणत्याही प्रकारचा आवाज होत नसल्याने वेग असूनही शांततेचा भंग होत नाही.
शिनकानसेनचे सीट पाहिजे तसे फिरवता येतात त्यामुळे कुटुंबा बरोबर किंवा मित्र मैत्रिणींबरोबर प्रवास करण्याची मजा काही निराळीच आहे. गप्पा-गोष्टींच्या आनंदात बाहेरची दृश्य पाहात असताना प्रवासाची मजा कैक पटीने वाढते.
ह्या ट्रेन एक ट्रिप पूर्ण केल्यानंतर दुसर्‍या ट्रिप साठी तयार करणे हे काम काही ७ मिनिटांच्या आत पूर्ण केले जाते. (स्वच्छतासीटची दिशा बदलणे, गाडीत काही चुकून विसरलं गेलं आहे का पाहणे इ.)
हे सगळं इतक्या फास्ट डोळ्यासमोर पाहिले कि आवर्जून वाटते, “अरे माणसे आहेत की रोबोट?” इतक्या जलद शिस्तबद्ध आणि को-ऑर्डिनेटेड हालचाली!
शिनकानसेन ट्रेनचे एक डॉक्टर आहेत बरं का! जे ह्यांना तपासतात त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत नाही.
ट्रेन्स च्या मार्गाची व ट्रॅकची नियमित तपासणी करण्या करिता स्पेशल शिनकानसेन (Dr. Yellow) बऱ्याचवेळा ट्रॅक वर धावतात.
शिनकानसेन ने रोज उपडाऊन करणारे बरेच जपानी नागरीक आहेत. शिनकानसेन दररोज साधारण ५-१० मिनिटाला एक अश्या धावतात. तोक्यो ते ओसाका रेल्वे नेटवर्क हे जगातलं सर्वात बिझी हायस्पीड रेल्वे नेटवर्क आहे.
आनिमे आणि कार्टून फॅन ह्यांच्यासाठी खास आकर्षण म्हणजे इथल्या स्पेशल पिरियड साठी धावणाऱ्या काही खास डिझाइनच्या ट्रेन. सगळ्या कार्टून फॅन्स करता आनंदाची विशेष भेट घेऊन  ट्रॅक वर धावताना दिसतात.

ह्या रुबाबदार गाड्यांची सफर करणे जपानमधील मस्ट एक्सपीरियन्स!

शिनकानसेनचा प्रवास खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये नसला तरी जलद आणि सुकर प्रवासाचा उत्तम मार्ग म्हणून ह्या गाड्यांचा जपानच्या वाटचालीमध्ये मोलाचा वाटा आहे.

© प्रणाली मराठे

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..