तिने कधीतरी विचारलंस,
अरे तुला कुठलं फुल आवडते ?
तेंव्हा मी क्षणात उत्तरलो..
मनात जपायला चाफा आवडेल
आणि ओंजळीत धरायला मोगरा…
वहीत ठेवायला बकुळ आवडेल
आणि धुंद व्हायला केवडा…
बोलायला अबोली आवडेल
आणि फुलवायला सदाफुली…
पण, प्राजक्त मात्र आवडेल तो,
हृदयाशि धरायला..आधारासाठी…
यावर ती थोडीशी नाराज झाली,
मी ते ओळखलं…
पुढे झालो आणि हलकेच हसत म्हणालो,
हे सगळं आवडेल …… पण कधी
तर निशिगंधा मिठीत दरवळल्यानंतर…!!
तेव्हापासून ती अखंड दरवळत आहेस…
माझ्या मिठीत, मनांत … हृदयात…!!!
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
Leave a Reply