नवीन लेखन...

करण चाफेकर

आता प्रत्येक तरुण मुलाने परिस्थिती बरोबर लढण्यासाठी कुणावरही निर्भर न रहाता ” आत्मसिद्ध ” होणे आवश्यक असून तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे.

करण सतीश चाफेकर हा पाटकर डोबिवलीच्या पाटकर शाळेमधून दहावी पास झाला. शाळेमध्ये इयत्ता ५ वी पासूनच त्यांचा विज्ञानाकडे ओढा लागला तो त्यांच्या वडिलांमुळे आणि आजोबा लक्ष्मण शंकर चाफेकर यांच्यामुळे . त्याचे आजोबा आता९५ वर्षाचे आहेत ते माझगाव डॉक मध्ये नोकरी करत होते. टेक्निकलचा वारसा त्याला त्याच्या आजोबांकडून मिळाला. करणच्या वडिलांनी करणला अनेक कर्यक्रमांना नेले , क्रिकेटचे समाने दाखवले , परंतु तो तेथे काही रमला नाही एकदा त्याच्या वडिलांनी त्यांच्या वरळीला नेहरू सायन्स सेंटरमध्ये नेले आणि तो तेथे खूप रमला आणि त्याच्या वडिलांच्या लक्षात आले की ह्याला विज्ञानाची आवड आहे. घरात खूप पुस्तके असल्यामुळे त्याचे वाचन होत असे. त्याचे बालवाडीच्या शिक्षण गिरगावात त्याच्या आजोबांकडे म्हणजे जनार्धन भोळे यांच्याकडे झाले.

डोबिवलीला आल्यावर करण लहान लहान वैज्ञानिक स्पर्धांमधून भाग घेऊ लागला. सातवीमध्ये का सहावी मध्ये असताना त्याने एक वेगळा रोबोट तयार केला होता . त्यासाठी तो पवईला आय. आय. टी . मध्ये टेकफेस्ट साठी गेला होता. त्यांनी आणखी रोबोट बनवला होता त्याची स्पर्धा पुण्यामध्ये होती . त्यामध्ये त्याला पाहिले बक्षीस मिळाले होते. कारण त्या रोबोट ने जो स्पीड दाखवला होता तो खुप होता , त्यावेळी त्याची बरोबरो कोणीही करू शकत नव्हते.

करण लहानपणापासून वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेत असते. खरे तर त्याला आय. आय. टी . मध्ये परीक्षा द्यायची होती. तो तयारीही करत होता. परंतु त्याला काही मेडिकल प्रॉब्लेम झाल्यामुळे तो जाऊ शकला नाही . त्याचे 17 व्या वर्षी किडनी ट्रान्सप्लांट करावे लागले, बारावीनंतर त्याने ऐरोलीच्या दत्ता मेघे या महाविद्यालयात प्रवेश घेतला, परंतु त्याचे अभ्यासाकडे कधीच लक्ष नसे. सतत तो नवनवीन काहीतरी करत असे , इंटरनेट हाच त्याचा गुरु होता. प्रकृती नाजूक असल्यामुळे तो घराच्या बाहेर फारसा पडत नसे.

एक दिवशी तो खूप कंटाळला कारण त्याच्यावर आजारपणामुळे खूप बंधने होती . करणने त्याआधी भारतात सर्वात स्वस्त सी. एन . सी . मशीन बनवले , बॉम्ब डिफ्युज करणारा रोबोट बनवला , अशा त्याने अनेक गोष्टी त्यांनी तयार केल्या होत्या तरीपण त्याला नवीन काहीतरी करायचे होते. त्याच्या वडिलांनी सांगितले तू असे काहीतरी वेगळे कर . जे आपल्या इथे कुणीच काही केले नाही. शिक्षणात अडथळे तर येतच होते. त्याला त्याच्या वडिलांनी त्याला दोन महिन्याची मुदत दिली.

त्याने अत्यंत परिश्रम करून भारतात पहिल्यांदा ३ डी प्रिंटर तयार केला . हा काळ २०१० चा होता. त्यावेळी त्यातील अनेक लहान लहान भाग त्याला बाहेरच्या देशातून मागवावे लागले. हे सर्व करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते परंतु करणचे आई वडील यांनी करणला कधीच अडवले नाही. तो नेहमी म्हणात असे की ‘ माझ्या वर्गातील मुले नापास झाली की त्यांचे आई वडील त्यांना खूप बोलतात , रागवतात , तुम्ही काहीच रागावत नाहीत.’ त्याला ते विचित्र वाटे तो अनेक वेळा तसे बोलूनही दाखवत असे परंतु त्याचे आईवडील हे इतर पालकांसारखे नव्हते , त्यांचा करणवर विश्वास होता हा काही तरी वेगळे करेल म्हणून .

करणचा ३ डी प्रिंटर तयार झाला. परंतु हे लोकांना कळणार कसे. तर त्यावेळी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे फोटोग्राफर श्री. अनिल शिंदे यांना ही गोष्ट समजली . अनिल शिंदे अत्यंत स्वतः मेहनती आहेत . ते सतत नवनवीन शोधत असतात . ते घरी आले त्यांनी सगळे बघीतले . त्यांनाही जाणवले की हे काहीतरी वेगळे आहे. त्यांनी फोटो काढले आणि आठवडाभरात टाईम्स ऑफ इंडिया च्या देशामधील सर्व वृत्तपत्रात करण चाफेकर बद्दल मोठे आर्टिकल आले. ह्या आर्टिकल नंतर करणचे आयुष्यच बदलून गेले. अर्थात याचे सर्व श्रेय अनिल शिंदे यांना जाते कारण योग्य वेळी हात देणारा कुणीतरी असावाच लागतो.

पुढे करण अनेक प्रयोग ३ डी प्रिंटरमध्ये करत गेला. त्याचे दत्ता मेघे कॉलेजपासून अनेक संस्थांनी त्याच्या यशाचे कौतुक केलं. परंतु या गडबडीत त्याचे शिक्षण राहिले , शेवटच्या वर्षात एकीकडे के. टी . लागलेल्या विषयांची संख्या वाढत होती तर दुसरीकडे त्याची प्रसिद्धी. त्याने सुमारे १२ ते १५ ३डी प्रिंन्टर्स जपानला पाठवले , अनेक लोकांना ३ डी प्रिंटर करून विकले. अनेकांनी भारतात ३ डी प्रिंटर तयार करायला सुरवात केली परंतु याचे मूळ श्रेय डोबिवलीकर करणचे होते आणि हे सर्वानी मान्यच केले होते. ऑस्ट्रेलियामधील एका पुस्तकात त्याचा उल्लेख आहे , ते पुस्तक ज्याने लिहिले त्याने भारतात येऊन करणची मुलखात घेतली. करणचा मेंटॉर हे मिस्कीन इंगवले हे आहेत , करण त्यांना खूप मानतो . मिस्कीन इंगवले यांनी जगामधील पाहिले मोबाईल ऍप बनवले की माणसाचे रक्त न काढता , हिमग्लोबीन कळते. करणच्या एका मशीनचे डिझाईन मिस्कीन इंगवले यांचे मित्र ऑलिव्हर ब्लॅकवेल यांनी केले होते. ते करणच्या घरी आले होते. ऑलिव्हर ब्लॅकवेल यांनी जगातले पाहिले ‘ पेनलेस इंजेकशन ‘ तयार केले ते इंग्लंडमध्ये रहातात. करणला शिक्षणाला रामराम ठोकावा लागला कारण अभ्यास आणि संशोधन एकावेळी करता येत नव्हते. भारतात अनेक ठिकाणी करणला अनेक ठिकाणी लेक्चरसाठी बोलवले जाते तेव्हा त्याची शिक्षण कधीच आड येत नाही. करणने सिद्ध करून दाखवले की आपण जर एका गोष्टीचा ध्यास घेतला तर काहीही करू शकतो. त्याला शिक्षण हवे असे नाही. जेव्हा कलिना येथे मुंबई विद्यापीठाने त्याला अवॉर्ड दिले तेव्हा त्या भाषणांमधून करण याने जेव्हा सांगियले की मी ड्रॉप आऊट स्टुडंट आहे तेव्हा समोरची मुले खुश होऊन टाळ्या वाजवत होती कारण शिक्षणामधला फोलपणा त्यांना कळलेला असतो असेच म्हणावे लागले . परंतु करणसारखा ‘ वळलेला ‘ नसतो.

करणने बंगलोर येथे दोन महिने एक ३ डी प्रिंटर बनवणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी केली पण तेथे तो वैतागला. कारण त्याला हवे तसे वातावरण तेथे नव्हते. आज करण एका कंपनीला ग्रे सिम नावाच्या कंन्सल्टंसी कंपनीमध्ये होता. पण ती कंपनी सोडली आणि आता स्वातंत्रपणे कन्सल्टन्सी करत आहे.

आज भारतात इतक्या वर्षांनंतरही ३ डी प्रिंटर ही संकल्पना रुजू शकत नाही जी प्रदेशात अनेक वर्षे आधी रुजली आहे . याचे एकमेव कारण म्हणजे आपले पुस्तकी ज्ञान. बटन दाबले की यंत्र चालू झाले पाहिजे ही भावना अगदी खोलवर रुजली आहे ती नष्ट झाली पाहिजे यासाठी प्रॅक्टिकल ज्ञान असणे आवश्यक असते. ३ D प्रिंटर झाल्यानंतर करण राजभवनाला ए . पी . जे . अब्दुल कलाम यांची भेटला होता. गुगलवर करण चाफेकरची माहिती आणि व्हिडीओज , त्याच्या मुलाखती बघता येतील.

आजही करण दिवसातून १२ ते १४ तास घरामध्ये सतत काम करत असतो. नवीन काहीतरी करण्यासाठी उत्सुक असतो आणि तो करूनही दाखवतो हे महत्वाचे. कोईनच्या काळात त्याला सतत जपावे लगत आहे , तो स्वतःला खुप जपतो त्याचे सहकारीही त्याला जपतात.

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..