पृथ्वीच्या ७३ टक्के भागात पसरलेल्या महासागरांचे वैशिष्ट्य टिकवून ठेवावे, यासाठी काय-काय करता येईल, या दृष्टीने २००३ पासून जगभरात विचार सुरू झाला. ८ जुन रोजी ‘जागतिक महासागर दिन’ साजरा करण्याची कल्पना त्यातूनच जन्माला आली.
गेल्या २० वर्षांत जगातील सर्व महासागरांचे तापमान वेगाने वाढत असून अलिकडे सागरी तापमानवाढ आता खोलपर्यंत पोहोचली असून जे बदल महासागरातील पाण्याच्या उष्णतेत होत आहेत ते यात महत्त्वाचे आहे. महासागर हे पृथ्वीवरील जादाच्या उष्णतेपैकी ९० टक्के उष्णता शोषतात, ही बाब जागतिक तापमानवाढीशी संबंधित आहे. महासागर व वातावरणातील तापमानवाढीला कारण हे हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. पृथ्वीच्या एकूणच प्रणालीत किती उष्णता साठविली जाऊ शकते याचे प्रमाण ठरविणे महत्त्वाचे असल्यामुळे हवामानातील बदल कळू शकतील व त्यांचे विश्लेषणही करता येईल.
आगामी काही दशके व शतकात ही उष्णता किती वाढेल याचा अंदाजही करता येऊ शकेल. पृथ्वीचा तपामानवाढीचा वेग समजला तर सागरी जलातील पातळीत होणा-या वाढीचा अंदाजही लावता येणार आहे. सागरी तापमानात वरच्या भागात १९७० पासून जी वाढ झाली आहे ती हरितगृह वायूंशी संबंधित आहे. एकोणिसाव्या शतकातील महासागरी मोहिमांच्या माहितीचा वापर या संशोधनात करण्यात आला असून सागरात खोलवरील तापमान बदलांची अलिकडे केलेली नोंदही विचारात घेतली आहे.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply