मला माहीत आहे ,
‘ मी आणि ती ‘ हल्ली अनेकांना आवडत आहे ,
अर्थात कारण मला ती आवडते .
त्याच काय आहे ती मला भेटते अगदी रेग्युलर
परंतु प्रत्येक वेळेला काही घडतेच असे नाही.
अर्थात तुम्हाला हवे तसे.
परंतु मला हवे ते नेहमीच घडते.
रोज रोज काय सांगायचे,
तेच ते ,
पण त्या तेच ते मध्ये खरी गम्मत असते राव.
तिला सहज विचारले तुला मला भेटायला काआवडते ?
आपण लग्न तर करणार नाही आहोत.
ती काहीच बोलली नाही,
अर्थात तिने मला तसे विचारले असते तरी
माझ्याकडे काहीच उत्तर नसणार हे निश्चित ?
काही गोष्टी उत्तरापलीकडल्या असतात
हे मात्र आता मला पटले आहे.
तशी ती गमतीदार आहे.
अर्थात मी पण तसाच ,
मायनस मायनस प्लस हाच हिशेब आहे आमचा.
आम्ही एक मात्र ठरवले होते ,
एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही.
तरी पण थोडीफार होतेच..
अर्थात त्याचे परिणाम आपणच भोगायचे असतात.
आज असेच झाले
आम्ही दोघेही घरीच भेटलो
त्यामुळे बरेच ‘ अडसर ‘ दूर झाले होते..
समाजाचे ?
अर्थात ही आमचीच ऍडजेस्टमेंट होती.
आज घरी बिअरचे टिनच आणले होते ..
टिनचे फक्त झाकण ‘ सहजपणे उघडायचे.
मनाचे आणि….
शरीराचे….?
विचार तेव्हा गोधळ घालण्यास सुरवात करतात .
सोबत जगजीतची गजल असते.
आणखी काय हवे.
कितीवेळ असाच निघून जातो.
खरे तर आम्ही त्यावेळी खूप शांत असतो.
एकमेकांचे हातात हात घेऊन.
वासना पार निघून गेलेली असते.
त्यासाठीच आपण नेहमी एकत्र येतो का ..?
हे आम्हा दोघांना चागंलेच पटले होते.
दोघांनी एकत्र येणे ही आम्हा दोघांची गरज आहे.
तितक्यात जगजीतची ‘ झुकी झुकी सी नजर ‘
ही गजल सुरु झाली..
आम्ही खरे तर दोघेही एक झालो होतो,
ती गजल ऐकता ऐकता .
कितीवेळ आम्ही एकत्र होतो…
काहीच कळले नाही…
काय झाले ते…
जो काही वेळ गेला
तो कसा गेला याचेही भान राहिले नाही….
सॉलिड अनुभव होता आजचा..
खऱ्या अर्थाने मनाने
आज एकत्र आलो होतो…
सतीश चाफेकर.
Leave a Reply