जीवा जगण्याचीच एक आंस
जीवन जरी हे असे अशाश्वत
ध्यास ऋतूसोहळे भोगण्याचा
जीवन, जरी हे असे अशाश्वत
धुंद बेधुंद, बरसात मृदगंधली
चिंब चिंब भिजलेली श्वासात
बेभान तनमन, अधिर मिठीस
जीवन, जरी हे असे अशाश्वत
घुमता कृष्णमेघ सावळ्या नभी
शब्दश्रावण झरझरतो अंतरात
निनादती, सुरेल स्वर गंधर्वाचे
जीवन, जरी हे असे अशाश्वत
अगम्य, अतर्क्य, चक्र जीवनाचे
तरीही सावरतो अनामिक शाश्वत
जीवाजीवा ओढ वात्सल्यप्रीतीची
धर्म ! केवळ एक मानवता शाश्वत
डोहात डोळ्यांच्या निर्मळ आनंद
जीवन, जरी हे असे अशाश्वत
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १२२
२१ – ९ – २०२१.
Leave a Reply