कधीतरी दे तुझ्या ओंजळीतली फुले,
सुगंधाने भरू दे माझ्या अंगणातले झुले
कधीतरी ये वावटळीच्या वाऱ्याला घेऊन,
उधळून दे मनातले सगळे पाश सारे तोडून
कधीतरी ये चिंब ओली बनून माती,
जीव तळमळेल फक्त त्या वेड्या सुंगंधासाठी
कधीतरी दे तुझ्या मनातले थोडे जग,
व्यापून उरेन इतका, कधी देऊन तर बघ…
— वर्षा कदम.
Leave a Reply