नेहमीच तिन्हीसांजेला वाट पाहीली
आमचे बाबा घरी कधी येतील?
मायेचा पंख पसरून कुशीत कधी घेतील
परिराणीची गाणी कि गोष्ट आज सांगतील?
नेहमी सांगे आई, कामात गुंतले असतील
निज बाळा आता, आत्ता इतक्यात येतील
वाट पाहून पाहून डोळे जाती थकून
दिवा जाई विझून नि रात्र जाई सरून
बाबा येण्याची रात्र कधी उगवलीच नाही
गोड गोष्टींच सुख कधी लाभलंच नाही
बाबा तुम्ही कधी आलाच नाहीत का?
कि निजलेले आम्हाला पाहून थांबलाच नाहीत का?
एकदातरी तुम्हाला अभिमानाने पाहायचं होत
एकदातरी तुमच्यासारखं होईन, मनातलं हे बोलायचं होत
मनातलं सार काही मनातच राहून गेलं
आठवताना तुम्हांला डोळ्यातलं मळभ वाहून गेलं…
— वर्षा कदम.
Leave a Reply