होते पहाट आल्हाद गारवा
झेडीतो हलकेच शिरशिरी मारवा,
प्राजक्त उमलतो हलकेच असा
अंगणी बहरुन गंधित सडा..
उगवतो रवी केशरी प्रभा
रंग बावरे किरमिजी आभा,
उगवत्या रवीस उषेची साथ जरा
दवबिंदूची दाटी पानोपानी थेंब सजता..
किलबिल पक्षी थवा आकाशी जसा
माळ एका लयीत फिरफिरती पाखरे पुन्हा,
सजले आकाश सजली नटून धरा
थबकले मन परतुनी वळणावर पुन्हा या..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply