नवीन लेखन...

क्रिकेटपटू सुभाष गुप्ते

सुभाष गुप्ते यांचा जन्म ११ डिसेंबर १९२९ रोजी झाला.

सुभाष गुप्ते हे लेगस्पिनचे बादशहा. ३६ कसोट्यांमधून १४९ बळी मिळविलेले सुभाष गुप्ते हे आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील सर्वाधिक चमकदार फिरकीपटूंपैकी एक होते. फलंदाजाने आक्रमक रूख़ अंगिकारल्यास मात्र गुप्ते काहीसे धास्तावतात असेही निरीक्षण या संघातील खेळाडूंनी नोंदविलेले आहे.

गुप्तेच्या गोलंदाजीने अनेक महान फ़लंदाजांना प्रभावित केले होते. ज्या वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी पाहून जगभरातील गोलंदाजांना धडकी भरत असे, अशा वेस्ट इंडिज संघाविरोधात सुभाष गुप्तेनी १९५३ सालच्या दौऱ्यात २३.६३ च्या सरासरीने ५० प्रथम श्रेणी बळी व २७ कसोटी बळी घेतले आहेत. यात ८ प्रथम श्रेणी सामने होते.

१९५४-५५ मध्ये मुंबईकडून खेळताना बहावलपुर इलेव्हनचे सर्व १० खेळाडू ७० धावात बाद केले होते. प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये सर्वच्या सर्व फलंदाज बाद करण्याचा रेकॉर्ड सर्वप्रथम सुभाष गुप्ते यांनी केला होता जो १९५६ मध्ये प्रेमंगसु चॅटर्जी यांनी तोडला. प्रेमांगसू चॅटर्जी यांनी २० धावात तब्बल १० बळी घेत गुप्तेचा रेकॉर्ड मोडला. आजही प्रथम क्रिकेटमध्ये चॅटर्जी यांचा २० धावात १० बळींचा रेकॉर्ड कायम आहे. सर गॅरी सोबर्स यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बघितलेल्या लेग स्पिनर्समध्ये सुभाष गुप्तेंचा क्रमांक पहिला लागतो. चेंडूला फिरक देण्याची क्षमता आणि उंची (फ्लाईट) बदलविण्यातील हातोटी ही गुप्तेंच्या गोलंदाजीची बलस्थाने होती. १९५८-५९ मध्ये भारतीय दौर्याववर आलेल्या वेस्ट इंडियन खेळाडूंच्या म्हणण्यानुसार सुभाष गुप्ते अगदी काचेवरही चेंडू वळवू शकत असे. सुभाष गुप्तेबद्दल एक किस्सा प्रसिद्ध आहे. सुभाष गुप्ते एव्हाना जगातील सर्वोत्कृष्ट लेगब्रेक-गुगली बॉलर म्हणून प्रसिद्धीस आला होता. बापू नाडकर्णीइतका नसला तरी गुप्ते “बर्यालपैकी कंजूस बॉलर” म्हणून ओळखला जात असे. गुप्तेची आणखीन एक खासियत होती ती म्हणजे कितीही मोठा बॉलिंग स्पेल टाकला तरी तो कधीही “नो-बॉल” टाकत नसे. परंतु ढाक्याच्या टेस्टमध्ये पाकिस्तानच्या कारदारला टाकलेला एक गुगली त्याला साफ चकवून गेला असतानाच गुप्ते आणि जवळपास उभ्या असलेल्या फिल्डर्सच्या कानावर अंपायरचा आवाज आला, “नो बॉल!”खुद्द गुप्तेच काय पण विकेटकीपर नरेन ताम्हाणे, स्लीपमध्ये असलेले माधव मंत्री, शॉर्टलेगला असलेला विजय मांजरेकर सगळेच वेड्यासारखे अंपायरकडे पाहत राहिले! तो पाकिस्तानी अंपायर होता इद्रीस बेग!

“सुभाषला नो बॉल देणारा एकमेव अंपायर म्हणून विस्डेनच्या रेकॉर्ड बुकमध्ये तुझ्या नावाची नक्कीच नोंद होईल!” धक्क्यातून सर्वात आधी सावरलेल्या माधव मंत्रीनी स्लीपमधून बेगला सुनावलं!

माधव मंत्रीनी आपला जाहीर “पंचनामा” केल्याचा परिणाम इद्रीस बेगवर निश्चीतच झाला असावा! संपूर्ण दौर्यात पुन्हा बेगने गुप्तेला एकदाही नो बॉल दिला नाही! भारताच्या एका दौर्यांत भारताकडे अनेक रथी-महारथी बॉलर्स असूनही पाकिस्तानच्या २० विकेट्स घेणं भारतीय बॉलर्सना जमलं नव्हतं! यात सिंहाचा वाटा होता तो अर्थातच इद्रीस बेगचा! १९५९ च्या इंग्लड दौऱ्यात त्यांनी २३ सामने खेळून २६.५८ च्या सरासरीने तब्बल ९५ बळी घेतले मात्र दौऱ्यात शतकी बळी मिळवण्याचा विक्रम फक्त ५ बळीनी हुकला. १९५८ च्या भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील कानपुर येथील सामन्यात सुभाष गुप्तेनी विंडीजच्या फलंदाजांची दाणादाण उडवत १०२ धावात ९ बळी मिळवले, पण जिम लेकरचा एकाच डावात १० बळींचा विक्रम करू शकले नाहीत. बहुसंख्य गोलंदाजांप्रमाणे सुभाष गुप्ते हे फ़क्त स्वत:च्या गोलंदाजीवर उत्तम क्षेत्ररक्षक होते; पण एरवी त्याचं क्षेत्ररक्षण म्हणजे आनंद होता. फलंदाजाने टोलावलेल्या चेंडूला ‘आऊटफिल्ड’मध्ये अगदीच एकटं एकटं वाटू नये म्हणून गुप्ते त्याची सीमारेषेपर्यंत सोबत करायचा. ‘तू हो पुढे, मी आहेच मागे’ असा जणू तो चेंडूला दिलासा द्यायचा. असा क्षेत्ररक्षक आता पाहायला मिळणार नाही व असा गोलंदाज आता देशात शोधून सापडणार नाही. एकूणच क्षेत्ररक्षण हा त्या काळी मोठा ‘इश्यू’ नव्हता. त्यामुळे गुप्तेसारखा महान गोलंदाज ढिसाळ क्षेत्ररक्षणापायी संघातून काढण्याची कल्पनाही कोणी करू शकत नव्हतं. २००० साली सुभाष गुप्तेंना सी के नायडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वेस्ट इंडिजमध्ये एक मुलगी पसंत करून तिच्याशी त्यांनी लग्न केले होते. त्रिनिदादलाच जाऊन मग गुप्ते स्थायिक झाले.

सुभाष गुप्ते यांचे ३१ मे २००२ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..