जगीचा, साराच छद्मीपणा
सुज्ञजन, सारे ओळखून आहे
सत्यता! विकृत मनांमनांची
साऱ्यांनाच, तशी ज्ञात आहे
काही, आत्मप्रौढी मिरविणारे
स्वतःला मी सर्वज्ञ मानत आहे
ते झाले जरी, थोडे आत्ममुख
स्वओळख त्यांची होणार आहे
जो शहाणा त्याचा बैल रिकामा
माणसा ही जगाची रहाटी आहे
मी,पणाचा आव कुणा नसावा
गर्वाचे घर नेहमीच खाली आहे
नम्रता, कृतज्ञता सदा वंदनीय
मीत्व! सर्वथाच निंदनिय आहे
करू नये सान, थोर इथे तुलना
सरणी सर्वां सारखा न्याय आहे
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३७.
६ – २ – २०२२.
Leave a Reply