काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला भेटले, त्या व्यक्तीविषयी, तिच्या आयुष्याविषयी ऐकल्यावर खूप वाईट वाटले….त्यावर सुचलेल्या काही ओळी
आहुती! (१४-०८-२०१८)
अशीच अगतिक झाले होते,
स्वप्न झुल्यावर झुलत होते,
मी प्याला त्याच्या प्रेमाचा,
अमृत समजुनी पित होते…
ओवला मणी त्याचा नावाचा,
भाळी कुंकुम टिळक लावले,
होम पेटला संसाराचा,
आहुती म्हणूनी स्वतःस चढवले…
रोज रोजचे तंटे वाजले,
अंगी लाल रांगोळी अन् काहूर माजले,
चणचणत्या जखमांचे तोरण,
खपली धरुनी गळून पडले….
थंडी बोचरी काय असते?
दुदैवाने तेव्हा कळली,
झोंबणाऱ्या या संसारातला,
निर्दोशी असूनही, मी एक बळी…!!
– कु. श्वेता संकपाळ.