संक्रांतीच्या वेळी आई मुलाला म्हणाली वाणाचं सामान आणायचे आहे पैसे देतोस का मुलानी काही रुपये काढून दिले. अरे आणखीन थोडे देतोस का बांगड्या भरायच्या आहेत मला. बांगड्या आहेत ना हातात. आई मान खाली घालून गप्प. आणि तसेही बांगड्या घातल्या शिवाय सण साजरा होत नाही का? आई मुकाट्याने बाहेर गेली. तोच चला मी तयार आहे मला साडी घ्यायची आहे सणासाठी. आणि आई थोड्याच दिवसा नतंर बांगड्या न भरताच या जगातून निघून गेली.
एका कागदात स्वता:ची काळी टोपी गुंडाळत बाप मुलाला म्हणाला येताना या मापाची काळी टोपी आठवणीने आण. त्यामुळे मी आजच्या दिवशी बाहेर जाणार नाही. टोपी आयुष्य भर वापरलात पण आता नाही वापरले तर काय फरक पडतो. आणि टोपीची सवय आहे तर मग काळी काय नि पांढरी काय सारखीच. आणि तसेही घरात बऱ्याच पांढऱ्या टोप्या आहेत त्या वापरुन टाका.
बापाने मरेपर्यंत टोपी वापरलीच नाही. आयुष्य भर टोपी शिवाय बाहेर न जाणारा बाप चौघांच्या खांद्यावर अनेक लोकांच्या बरोबर गावाच्या बाहेर बिना टोपीचा गेला तो गेलाच. बाबा चलांना आज आपण आत्ता मला क्रिकेटची कॅप घेऊ या.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply