● हळद हे सर्वश्रेष्ठ नैसर्गिक जंतूघ्न औषध आहे.
● कोणत्याही त्वचारोगात हळद उपयोगी पडते. खाज – खरूज असल्यास हळद उगाळून लेप द्यावा. सोबत कडुनिंबाची पाने ठेचून हळदीच्या चूर्णासोबत पोटात घ्यावी.
● ‘हरिद्रा प्रमेहहराणाम्…..’ म्हणजेच मधुमेहाच्या औषधांमध्ये हळद सर्वश्रेष्ठ आहे.
● कोणत्याही वयामध्ये पोटात जंत झाले असल्यास हळद चूर्ण व कडुनिंबाच्या पानांची गोळी करून वावडिंगाच्या काढ्यातून घ्यावी.
● हळद ही उत्तम शोथहर (सूज कमी करणारी) व जंतूघ्न असल्यामुळे घसा दुखी व सूज ; सर्दी , खोकला असताना गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या कराव्या.
● याशिवाय , अंगावर कोठेही मार लागून आलेल्या सुजेवर हळद आणि तुरटी एकत्र उगाळून लेप द्यावा.
● कोणत्याही प्रकारची जखम हळदीने भरून येते. जखमेतून येणारे रक्त थांबवतेच , शिवाय हळदीने जखम धुतल्यामुळे त्यात संक्रमण (infection) न होता ती लवकर भरून येते.
● वाताच्या रोगांमध्ये हळद तुपातून घेणे फायदेशीर ठरते. हळद साखरेबरोबर पित्तशामक आहे. तर मिठासोबत घेतल्यामुळे ती कफाचे रोग बरे करते. अशा प्रकारे हळद त्रिदोष शामक आहे.
● हळद मधातून चाटल्याने श्वसनसंस्थेचे रोग , जसे सर्दी-खोकला , दमा , आवाज बसणे , क्षयरोग यांच्यामध्ये लाभ होतो.
● स्त्रियांमध्ये प्रसुतीपश्चात दुधातून हळद घेणे फायदेशीर ठरते. याने अंगावरचे दूध (breast milk) वाढते आणि रक्तशुद्धीही होते. या काळात होणारे कंबरदुखी सारखे त्रासही टळतात.
● हळद ही सर्वश्रेष्ठ वर्ण्य म्हणजेच त्वचेचा रंग उजळणारी आहे. नुसता हळदीचा वास असणार्या क्रीम्सपेक्षा खरी हळद उगाळून लावल्यास उत्तम फरक पडतो.
● कोणतेही गळू किंवा फोड पिकून फुटण्यासाठी हळद आणि सुंठ उगाळून लेप लावावा.
● मुळव्याधीत हळद तुपात उगाळून लेप द्यावा.
● निरोगी व्यक्तीनेसुद्धा एक ग्रॅम हळद गरम पाणी किंवा दुधातून रात्री झोपताना घेतल्यास माणूस वज्रदेही बनतो. म्हणजेच , त्याची रोग प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा उत्तम राहाते.
[ टीप – सर्वच आजार केवळ प्रथमोपचारांनी बरे होत नाहीत. कोणत्याही आजारासाठी कोणताही उपचार घेताना तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ]
डॉ. अमेय गोखले ,
रत्नागिरी.
9422662772.
(05-05-2017)
Leave a Reply