त्याचा दोनदा फोन येऊन गेला
मी जास्त एन्टरटेन त्याला केले नव्हते.
पण तो डोक्यावरच बसला.
ठरल्या वेळेला आलेला माणूस 65-68 वर्षाचा असेल.
खूप थकलेला दिसत होता.
मला म्हणाला सर माझी सही बघता का ?
खूप प्रोलेम आहे..
त्याची सही बघितली..
ती बघून मला काही गोष्टी जाणवल्या.
मी म्हणालो , कुठल्या लफड्या..
माझे पूर्ण न होऊ तो म्हणाला.
ती पन्नास वर्षाची आहे.
ऑफिसमध्ये होती.
त्यावेळेपासून हे चालू आहे.
सर तिला माझी सवय आहे,
पण आता मला नाहीच
ओहोटी लवकरच सुरु झाली.
तिची लाट आता मी घेऊ शकत नाही.
थोपवू शकत नाही.
आता पैसे नाहीत ,
वाटण्या करून दिल्या.
मला तग्रविक रक्कम येते.
दर आठवड्याला लॉजचा खर्च सोसवत नाही.
माझी सही बदलता का ?
मी पुरता हैराण ,
म्हटले त्याचा आता
उपयोग नाही होणार.
आता ती वेळ गेलेली आहे.
तुमचा प्रवास आकृतीपासून सुरु झाला..
प्रकृतीकडे जाता जाता
विकृतीकडे कधीवेगळीच गेला
हे तुम्हाला कळलेच नाही.
मी म्हणालो शिफ्ट व्हा…
ते शक्य नाही…..
मग पटकन म्हणालो..
यातून तुम्हाला वाचवू शकेल
फक्त एखादा मोठा आजार..
त्याने चमकून माझ्याकडं पहिले …
त्याच्या डोळ्यात वेगळीच
चमक दिसून आली …
घाईघाईने उठत म्हणाला…
येतो…..
जाताना हातात ३०० रुपये कोंबले…
वेगाने निघून गेला…
ह्याच्या अंगात कुठली ताकद आली ..
काय करेल हा..
मनात विचार आला ..
हातातल्या ३00 रुपयाकडे बघितले….
प्लॅटफॉर्मवरून बाहेर येताना..
एक म्हातारी भिकारीण दिसली..
तिच्या हातात १00 च्या तीन नोटा टाकल्या..
आणि तिथून काढता पाय घेतला…
मनात फक्त तीन गोष्टी घोळत होत्या..
आकृती
प्रकृती…
आणि विकृती….
मनात विचार आला
मग मी कुठल्या पायरीवर आहे…..
सतीश चाफेकर.
Leave a Reply