सप्तसुरांचा जसा गंधार राजा
सण दिवाळी , हा सणांचा राजा
अविवेकाची विझवीत काजळी
आनंददीप उजळीत सुखदा आली ।।१।।
स्वर्ग ! त्रैलोक्याचा जणू अवतरला
दिप नभांगणीचेच सजवीत धरेवरी
अमंगळा सारुनी महन्मंगला आली
उधळीत आनंदाला दीपावली आली ।।२।।
क्षण क्षण , अत्तरी सुगंधात नाहला
प्रीतवात्सल्ये ओवाळीली निरांजने
दारी , अंगणी रंगली सडा रांगोळी
दीवाळी ऐश्वर्यसुखदा घेऊनी आली ।।३।।
वसुबारस , धनतेरस ,नरकचतुर्दशी
पाडवा , लक्ष्मीपूजन , भाऊबीजेची
पंचूकली ! दिपावलीची आनंदघनी
परंपरंगत , सुखदा तेजोमयी आली ।।४।।
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४१
२ – ११ – २०२१.
Leave a Reply