माझी दुसरी नात सानिका उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या मागे न लागता. सायलीची लहान बहिण आईच्या शाळेत मुलांना शिकवत आहे. आणि आता तर घरच्या शेतात लिंबाची दिडशे रोपे लावून या क्षेत्रातही आवडीने लक्ष घातले आहे. त्यामुळे तिचे मला खूप खूप कौतुक वाटले म्हणून…
लिंबलोण उतरते…
हिरव्या साडीस पिवळी किनार ग.
सानु लिंबास येईल बहार ग….
पिवळी पिवळी मोठी लिंबे येतील रसरशीत.
पाहूनच आईबाबा तेंव्हा येतील नक्कीच खुषीत…
आबंट गोड चवीचे घरोघरी होईल छान सरबत.
सगळे गावच देईल तुला मोठ्या आदराने मान.
उच्चशिक्षित असूनही तू घातलेस काळ्या रानी लक्ष.
निश्चितच लिंबाचेच मिळतील रुपये तुला लक्ष लक्ष..
कौतुक आहे ग तुझे कोणाला सांगू किती..
आज्जी भरल्या डोळ्याने तुझ्या वरुन लिंबलोण उतरती
मुलामुलीत नका करू कसलाही भेदभाव.
सानिका दाखवून दिले आहेस आम्हीही धावू शकतो भरधाव….
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply