नाव आहे गाव आहे ….आणखी का जोडणे रे ?
साम आहे दाम आहे…..आणखी का ओढणे रे ?
माणसांनी माणसाला वाटले आपापल्यापरि
जात आहे , पात आहे…..आणखी का तोडणे रे ?
राहण्याला झोपण्याला पाहिजे जागा किती तर
दोन आहे,चार पाहे……आणखी का लोढणे रे ?
केवढ्या चालीरिती ….चाली दलालांच्या असे या
शाप आहे ,पाप आहे…..आणखी का खोडणे रे ?
देवळे जास्तीच झाली आन मार्गावर नमाजहि
राम आहे,रहिम आहे……आणखी का पूजणे रे ?
#कौशल (श्रीकान्त पेटकर )
व्योमगंगा…..व्रुत्त
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
Leave a Reply