अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडीत यांचा जन्म १२ जुलै १९५४ रोजी झाला.
प्रसिद्ध संगीतकार जतिन-ललित यांची सुलक्षणा पंडित बहीण आहे. पंडीत जसराज हे सुलक्षणाचे सख्खे काका आहेत. उत्तम गायिका म्हणून सुलक्षणा पंडीत ओळख आहे.
मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्यासोबत अनेक गाणी तिने गायली आहेत. दूर का राही, चलते चलते, उलझन, संकोच, आहिस्ता आहिस्ता यांसह दहाहून अधिक सिनेमांसाठी तिने पार्श्वगायन केले आहे.
सुलक्षणा केवळ गायिकाच नव्हे तर ती एक उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे. आपल्या छोट्याशा अभिनय कारकिर्दीत तिने अमिताभ बच्चन, संजीव कुमार, जितेंद्र, शम्मी कपूर, राजेश खन्ना या अभिनेत्यांसोबत काम केले होते. उलझन, सलांखे, हेराफेरी, खानदान, वक्त की दीवार, दो वक्त की रोटी हे तिचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.
१९७५ मध्ये ‘उलझन’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता संजीव कुमार यांच्यावर सुलक्षणा पंडित यांचा जीव जडला होता. याच सिनेमाद्वारे सुलक्षणा यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. संजीव कुमार यांना त्यांनी लग्नाची मागणीसुद्धा घातली होती. मात्र त्यावेळी संजीव यांनी हेमा मालिनीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र हेमा यांनी ती मागणी फेटाळली होती. त्यामुळे संजीव त्याकाळात बरेच दुःखी होते आणि त्यांनी सुलक्षणाला नकार दिला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply