अभिनेत्री तितिक्षा तावडेचा जन्म ३ जुलै १९९० रोजी डोंबिवली येथे झाला.
तितिक्षा तावडेचे शालेय शिक्षण चंद्रकांत पाटेकर विद्यालय डोंबिवली येथून पूर्ण केले. शालेय जीवनात तितिक्षा उत्तम खेळाडू होती. क्रिकेट या खेळामध्ये विशेष रस होता. इयत्ता १०वी पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ती क्रिकेट खेळली आहे. तर पदवी शिक्षण मुलूंड वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केले. तर आय.एच.एम , गोवा येथून तिने हॉटेल मॅनेजमेण्टची पदवी घेतली. सुप्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे यांची ती बहिण आहे. अभिनायासोबतच ती उत्तम चित्रकार देखील आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सरस्वती’ या मालिकेमध्ये तितिक्षाने मुख्य अभिनेत्रींचे काम केले. झी मराठीवरील ‘कन्यादान’ या मालिकेमधून तितिक्षा घराघरात पोहोचली. ‘टोटल नादानिया’ या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा तितिक्षाने काम केले आहे. ‘सरस्वती’ मालिकेतून तितिक्षा तावडेने रसिकांची मनं जिंकली होती.
तितिक्षा तावडे ही टेलिव्हिजन क्षेत्रातील एक उत्तम आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील तितकाच मोठा आहे. लाइमलाईट मध्ये असलेल्या तितिक्षाला नेहमीच सोशल मीडियावर अनेक चाहते फॉलो करतात. तितिक्षा आणि खुशबू तावडे या दोन्ही बहिण अभिनय क्षेत्रात काम करत असल्यातरी दोघीही आता बिझनेसवुमन झाल्या असून लवकरच त्या दोघी मिळून ‘साइड वॉक कॅफे’ या नावाचे नवीन कॅफे सुरू केले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply