आधी त्याचे जग
आणि तिचे जग एकच होते,
नंतर मात्र संसारात हे
जग कधी विभागले हे
दोघांनाही कळले नाही
थोडा दुरावा झाला
परंतु चांगलेच झाले
एकमेकांचे ‘ प्रेम ‘
मार्गी लागले
खऱ्या प्रेमांत असेच
असते…आधी ते
अव्यक्त असते..
मग ते व्यक्त होते
आणि मग परत अव्यक्ततेकडे
प्रवास सुरु होतो
काही समजले का लेको….
— सतीश चाफेकर.
Leave a Reply