१-३ मीटर उंचीचे अडुळशाचे झुपकेदार क्षुप असते.ह्याची पाने ८-१० सेंमी लांब व काळपट हिरवी,गुळगुळीत व भालाकार असतात.फुले २-५-८ सेंमी लांब मंजिरी स्वरूपात असतात.पाकळ्यांची रचना हि सिंहाच्या जबड्या प्रमाणे असते.फळ २ सेंमी लांब लवयुक्त व शेंगेच्या स्वरूपात असते.
अडुळशाचे उपयुक्तांग आहे मुळ,पाने,फुले.अडुळसा चवीला कडू,तुरट असून थंड गुंणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कफपित्तनाशक व वातकर आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात.:
१)त्वचारोगमध्ये अडुळसाच्या पानांचा कल्क हळद मिसळून लेप करतात.
२)कफज खोकल्यात सैंधव व मधा सह अडुळशाचा रस देतात.
३)ताकामध्ये घसा सुकून तहान लागत असल्यास अडुळशाचा काढा मध साखरे सह देतात.
४)रक्तपित्तामध्ये अडुळसा रस मध साखरे सह देतात.
५)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांना अडुळशाची मुळी उगाळून तांदुळ धुवणातून देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply