परिणाम
मांसाहाराचा परिणाम कसा कुठे होत जातो आणि निसर्ग चक्र कसे बिघडते ते पहा.
भारतात मांसाहार सुरू झाल्यानंतर पशुधन झपाट्याने कमी होत गेले. कुक्कुटपालन सोडले तर शेळ्या मेंढ्या डुकरे, गाई म्हशी रेडे, यापैकी कोणत्याही प्राण्यांची शास्त्रीय पैदास केली जात नाही. शहरी लोकसंख्या वाढली, दुर्दैवाने मांसाहारी वाढले. पण ही तथाकथित कृत्रिम गरज भागवण्यासाठी लागणारे पशूधन वाढवण्यासाठी मात्र काही झाले नाही.
परिणाम ?
पशुधन झपाट्याने कमी होत गेले.त्याचा परिणाम शेतीवर झाला. कृषीप्रधान भारत अशी ओळख असणाऱ्या देशाच्या भन्नाट मतीकर कृषीमंत्र्यांना सांगावे लागले, की कृषी करणे सोडून द्या. कृषी करण्यापेक्षा धान्यापासून दारूच तयार करणे जास्त फायदेशीर आहे. शेतकरी आत्महत्या करू लागले. अशी वेळ का यावी ? याचे उत्तर कुठे आहे ? कोणाकडे आहे ? हे एवढ्यावरच थांबलेले नाही.
एक आकडेवारी सांगते की, भारतातील मांसाहार कमी झाला आहे, पण प्रत्यक्षात कत्तलखान्यांची संख्या वाढली आहे. भारताला स्वातंत्र मिळाले तेव्हा एका तासात तीन या प्रमाणात पशुहत्या होत होती, ते प्रमाण आता मिनीटाला चौवीसपेक्षा जास्त झाले आहे.
परिणाम ?
एकावन्न साली दर हजारी असलेले 340 गोधन कमी होऊन दोन हजार साली फक्त 110 उरले आहे. गायच कापली गेल्यामुळे पुढचा वंश देखील वाढायचा थांबला. फक्त गायच नव्हे तर, शेळ्या मेंढ्या म्हैशी रेडे यांची तीच गत आहे.
परिणाम?
पशुपालन व्यवसाय हा शेतीपूरक न बनता, मांस ऊत्पादक होऊ लागला.
भारतातील नैसर्गिक रित्या पोसलेल्या पशुंच्या मांसाला, बाहेरील देशात खूप मागणी आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील धनिकांचे जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हवाईमार्गे मांसनिर्यात सुरू झाली.
आधुनिक कत्तल कारखान्यांमधे भरपूर पैसे देऊन, विकत घेतलेले चविष्ट लुसलुशीत मांस कसे मिळेल यावर भर दिला जातो.
परिणाम ?
यासाठी कमी वयाची वासरे, तरूण धष्टपुष्ट गायबैल, म्हैस रेडे, वा शेळ्या मेंढ्या यांची कत्तल करण्याकडे जास्त भर दिला जातो. वयस्कर, भाकड, नको झालेले पशुधन या आधुनिक कत्तलखान्यांना नको असते.
परिणाम ?
स्वाभाविक पैदाशीच्या वयातील पशुधनावर कत्तलीचे संकट येऊन कोसळते.
भारतातील पशुधन वाचावे म्हणून लोकांनी शाकाहारी बनावे, असं सांगण्याचा कोणताही हेतु नाही. फक्त परिणाम कोणत्या स्तरापर्यंत पोचतात त्या परिणामांची ही एक झलक आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
10.10.2016
Leave a Reply