असे का ?
मांस खाण्याविषयी दोन माणसांमधे तरी एकमत कुठे होते. ? प्रत्येकाच्या धारणा वेगवेगळ्या. प्रत्येकाची मते वेगळी. परस्पर अगदी विरूद्ध.
भारतातील हिंदु गाईला माता मानतात, ते गोमांस खात नाहीत, तर इतर देशा धर्मातील नव्हे तर भारतातील मुसलमान गोमांस खातात. ते माता बिता काही मानत नाहीत. पण मुसलमानांना डुकराचे मांस पूर्णतः निषिध्द. नाव सुद्धा चालत नाही. बाकी दोघांनाही शेळ्या मेंढ्या बकऱ्या चालतात. असे का ?
भारतातील जाऊ देत, जपानमधे कच्च्या मांसाचे लोणचे चटणी आवडीने खाल्ली जाते, तर इंग्लंडमधे मात्र कच्चे मांस खाणे अशिष्टपणाचे समजले जाते. असे का ?
चीन तैवान मधे कुत्र्याचे मास खाल्ले जाते, पण युरोपीयन देशात कुत्र्याचे मांस हा शब्द उच्चारला तरी ए, कुत्र्या म्हणून शिवी ऐकायला येईल. असे का ?
अरब देशात घोड्याचे आणि उंटाचे मांस प्रिय आहे, ऑस्ट्रेलियातून घोड्याचे मांस अरबांना विकले जाते, म्हणून अमेरीका, ऑस्ट्रेलियावर बंदी घालायची मागणी करते. असे का ?
डुकराचे साॅस खाणारे जर्मन, म्हणून इंग्रज लोक त्यांची टिंगल करतात, तर मासेमारीसाठी विनाकारण वेळ फुकट घालवणारे म्हणून इंग्रजांची जर्मनीमधे चेष्टा होते. असे का ?
अर्जेंटिना, मेक्सिको येथे हाॅटेलमधे जिवंत प्राणी तुमच्यासमोर आणून त्यातील कोणता अवयव तुम्हाला आहे, असे विचारून तुमच्या समोरच त्याला कापून तो अवयव तुम्हाला देतात, हे पाहून युरोपीयन माणूस चक्कर येऊनच पडतो. असे का ?
मध्यपूर्वेमधले देश प्राण्यांची हत्या करताना त्यांचा गळा चिरतात आणि वाहाणारे रक्त गर्दी करून गटागटा पितात, हे वाचताना देखील अस्सल मांसाहारींच्या अंगावर काटे येतात. असे का ?
भारतातील अस्सल मांस खाणारा जेव्हा अमेरीकेत किंवा युरोपमधे जातो, तेव्हा तेथील स्टेक म्हणजे नुसत्या वाफवलेल्या मांसाच्या तुकड्याला घश्याखाली घालवताना यांचा जीवच जातो. असे का ?
भारतातील बंगाली माणूस माशाचे डोकेपण आवडीने खातो, पण बिहारी लोकांना, साधे मासे पण खाता येत नाहीत, म्हणून बंगाली बाबु चिडवतात. असे का ?
भारतातील शीख लोक एका झटक्यात मारलेला प्राणीच खाण्यासाठी वापरणार पण मुसलमान मात्र प्राण्यांचा गळा अर्धा चिरून सारे रक्त वाहून गेल्यावर, हाल हाल होऊन मेल्यानंतरचे हलाल मांस खातात. दोघांनाही दुसऱ्या प्रकारचे मांस अजिबात चालत नाही. असे का ?
हे सर्व बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते, की मूळ संस्कार, तेथील नैसर्गिक उपलब्धता, धर्म भावना, जमिनीची कृषी उत्पादनांची सकसता आणि स्वाभाविक ओघ इथपर्यंत आपण पोचतो.
जिथे अन्नधान्यांचे उत्पादनच न के बराबर आहे तिथे जगण्यासाठी मांस खाण्यावाचून पर्यायच नव्हता. पण आता तसे नाही. काळ बदललाय, संसाधने बदलली आहेत. मेहनत केली तर, अन्नधान्याचा तुटवडा कधीही पडणार नाही एवढी उपजाऊ जमिन शिल्लक आहे, अशा देशात आता शेतीमधे बदलाचे वारे वाहू लागले आहेत….
गरज आहे आपल्या मानसिकतेमधे बदल करण्याची.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
7.10.2016
Leave a Reply