भ्रष्टाचार आणि बेईमानीचा देशात सुकाळ आला असताना, एखाधा प्रामाणिकपणाचा प्रसंग अनुभवास आल्यास आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. छोट्या मोठ्या कामाच्या प्रसंगांची वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या माणसांचीही आज कमतरता नाही. परंतु प्रामाणिकपणाने जगतांना या हाताचे दुसऱ्या हाताला कळणार नाही याची काळजी घेणारे माणसे बघून, ‘जीवंत माणुसकीचा प्रत्यय येतो’.
असाच प्रसंग माझ्या अनुभवास आला, मी नागपूरला लोकमत भवन येथील पतंजली चिकित्सालयात पत्नीला उपचारासाठी घेऊन होतो. घरी परत असताना,चिकित्सालयातच माझ्या पत्नीचे पर्श विसरले.आम्ही घरी पोहोचेपर्यंत हे ध्यानातही आले नाही.घरी आल्यानंतर लक्षात आले, तेव्हा चिकित्सालयात दूरध्वनी करून पर्श विसरल्याचे कळविले.पुन्हा एक महिनापर्यंत नागपूरला जाणे झाले नाही, एक महिन्यानंतर गेल्यावर पार्शची आठवण करून देताच चिकित्सालय व्यवस्थापकाने एक पिशवीत ठेवलेले पर्श काढून दिले.
आश्चर्याची बाब म्हणजे पर्शमधील दोन हजार रुपये, मोबईल व अन्य कागदपत्रे सुरक्षित होती. पर्श परत देताना चिकित्सालय व्यवस्थापकाच्या चेहऱ्यावर निरागस आणि निरपेक्ष भाव होते.
मी धन्यवाद व्यक्त केल्यावर,’ हे आम्हा भारतीयांचे कर्तव्य आहे’ असे उत्तर दिले.माझ्याकडून चहाही घेण्यास नकार दिला.हा सर्व प्रकार बघितल्यावर,मला पुन्हा प्रत्यय आला कि ,’माणुसकी आजही जीवंत आहे.’ ती मात्र शोधन्याची गरज आहे.
पाच आणि दहा रुपयांसाठी माणसाचे मुडदे पडणाऱ्या या जगात, हजारो रुपयांना स्पर्श न करणाऱ्या माणसांमुळेच आज माणुसकी आणि विश्वास जीवंत आहे.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply