हिचा वापर आपण घरगुती उपचारांमध्ये सर्रास करत असतो.तशी हि आपल्या सर्वांचीच अगदी जीवाभावाची सखी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.कारण प्रत्येकाच्या घरात अंगणात हिचे एखादे तरी रोप आढळतेच.
हिचे क्षुप ०.३३-०.६५ मीटर उंच असते.पाने ३०-४० सेंमी लांब व ७-१० सेंमी रूंद असतात.हि टोकाकडे निमुळती होत जातात.पाने मांसल असतात त्यांच्या कडा काटेरी असतात व पृष्ठ भागावर पांढरे ठिपके असतात.पानात बुळबुळीत पारदर्शक गर असतो.जुन्या क्षुपात मध्यभागी अंक दण्ड निंघतो व त्याच्या टोकाला तांबूस फुल येते.कोरफडीच्या रसा पासून घनसार बनवितात ज्याला काळाबोळ असे म्हणतात.
हिचे उपयुक्तांग आहे पान.कोरफड चवीला कडू,गोड असून थंड,जड व स्निग्ध असते.तर काळा बोळ हा कडू,उष्ण तसेच हल्का,रूक्ष,तीक्ष्ण असतो.
हिचा उपयोग अवस्थानुरूप तीन्ही दोषांवर होतो.
चला आता आपण हिचे उपयोग जाणून घेऊयात:
१)वेदना व सुज असलेल्या जागी काळ्याबोळाचा लेप करतात.
२)पोटफुगी व पोटदुखी ह्या कुमारच्या गर साजूक तुप व मिरपूडी सोबत देतात.
३)तापामधील अंगाचा दाह कमी करायला कुमारीचा उपयोग होतो.
४)रक्ताल्पते मध्ये तसेच काविळ ह्यात यकृताचे कार्य कुमारीने सुधारते.
५)कोरफडीचा गर भाजलेल्या व्रणावर लावल्यास जखम लवकर भरते व दाह कमी होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply