“आहीस्ता चल जीन्दगी,
अभी कर्ज चुकाना बाकी है.. कुछ दर्द मिटाना बाकी है,
कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..!”
आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस..
वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..
एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन पुढं सरकत आणि मेहेनतीने प्राप्त केलेल्या त्या गोष्टीचा नीटसा आस्वादही घेता येत नाही..
“रफ्तारमे तेरे चलने से,
कुछ रुठ गये, कुछ छुट गये..
रुठोंको मनाना बाकी है,
रोतोंको हसाना बाकी है..!”
तसच दु:खाचही..! एखादं खुप जवळचं माणूस हरवावं पण त्याच दु:ख करायलाही वेळ नसतो हल्ली आपल्याकडे..
“कुछ हसरते अभी अधुरी है,
कुछ काम भी जरूरी है..
ख्वाईशें जो घुट गयी इस दिल मे,
उनको दफनाना बाकी है..!”
वर्षाच्या सुरुवातीस नविन वर्षात आपण काय काय करायचं हे ठरवत असतो..त्यातल्या काही गोष्टी होतात, काही अर्धवट होतात तर काहींवर पाणी सोडांव लागतं..तरीही दर नविन वर्षाच स्वागत आपण त्याच उत्साहानं करत असतो कारण नविन वर्षात काहीतरी आणखी चांगलं घडेल ही उमेद असतेच..
आयुष्याबरोबर चालावंच लागतं..तु पुढे चल, मी येतो मागून असं म्हणून नाही चालत..
“तू आगे चल, मै आता हूॅं
क्या छोड तुझे मै जी पाऊंगा?
आहीस्ता चल जिंदगी
अभी कई कर्ज चुकाना बाकी है..!!”
अलविदा २०१६..!!
— नितीन साळुंखे
Leave a Reply