विसरून गेलो सारे कांहीं,
आठवत नाही मला,
रचली होती एक कविता,
त्याच प्रसंगाला ।।१।।
जल्लोषांत होतो आम्हीं,
दिवस घातला आनंदी,
खिन्नतेचा विचार त्या दिनीं,
शिवला नाही कधीं ।।२।।
नाच गावूनी खाणेंपिणें,
सारे केले त्या दिवशीं,
बेहोशीच्या काळामध्यें,
कविंता मजला सुचली कशी ।।३।।
छोटे होवून गेले काव्य,
अमर राहिले आतां ते,
प्रसंग जरी तो मरून गेला,
कविता जिवंत राहते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply