काही माणसे अमर असतात तसेच अमरीश पुरी. मला त्यांना अनेकवेळा स्वाक्षरीच्या निमित्ताने भेटता आले , एकदा तर जहागीर समोर असलेल्या नॅशनल आर्ट गॅलरीमध्ये त्यांनी धर्मवीर भारती यांच्या कवितांवर कार्यक्रम झाला होता तो ऐकता आला, आपल्या चित्रपटसृष्टीत मग मराठी असो हिंदी असो ज्यांनी ज्यांनी व्हिलनची कामे केली ते खरोखर प्रत्यक्षात खरे हिरो होते आणि जे हिरो आहेत ते मात्र …जाऊ दे तो विषय… तर म्हणत होतो अमरीश पुरी , के.एन.सिग काय, प्राण , आपले निळू फुले किंवा राजशेखर असे अनेक कलाकार चित्रपटात व्हिलन ची कामे करत होते पण प्रत्यक्षात मात्र खरी माणसे होती.
मलाच आठवतं ओबेरॉय हॉटेल समोर एक कलाकारांची रॅली बऱ्याच वर्षांपूर्वी निघालेली , एक कट्ट्यावर के.एन. सिग बसलेले होते, मी त्यांच्याजवळ गेलो, स्वाक्षरी घेतली आणि बोलत असताना, जर लांब अमरीश पुरी मिडियाशी बोलत असताना मी म्हणालो सिंग साहब अमरीश पुरी भी आये हुये है कारण सिंग साहेबांची त्यावेळी दृष्टी अधू झालेली हाती, ते मला म्हणाले अमरीश को बुलाओ मी त्या गर्दीतून वाट काढत गेलो आणि अमरीश पुरी यांना निरोप सांगितला, सर्व मुलाखती बाजूला सारून अमरीश पुरी म्हणाले, चल दिखाओ मुझे, मी त्यांना सिंग साहेबांकडे घेऊन गेलो आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.
अमरीश पुरी यांचे रंगभूमीवरील योगदानही खूप मोठे आहे.
असा हा माणूस जेव्हा कोणत्यातरी अभद्र दिवशी, अभद्र वर्षी आपल्या प्लॅनेट वरून आपल्यातून निघून गेला तेव्हा खूप खूप वाईट वाटले राव… तो उपरवला इथल्या खुश होणाऱ्या मोगॅम्बोला घेऊन गेला खरा… पण तोही हळहळला असणार.. अशी माणसे परत न होणे रे बाबा..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply