चैतन्य तुझ्या हृदयीचे सदैव असेच राहू दे
खोडकरपणा तव मनीचा सदैव असाच राहू दे ।
वार्धक्याची जाणीव नच व्हावी तुजला कधीही
मजवरचा प्रेमवर्षाव सखे सदैव असाच राहू दे ।
आता भांडण नच कोणाशी ना वैर आहे आपुले
एकमेकावरील प्रेमाची साथ सदैव टिकून राहू दे ।
तुजवरील प्रेमाने मी रचिल्यात कैक कविता जरी
त्या कवितेतील रचनांचा कैफ असाच राहू दे ।
मधूर तव कंठामधून ऐकल्यात मी माझ्या गझल
त्या मधूर तव कंठातील नशा अशीच धुंद राहू दे ।
एकेक शब्द तुझ्या मुखीचा अमृताचा प्याला जणू
अमृतानुभव तो मजला सदैव मिळत राहू दे ।
— सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
दि. १६ सप्टेंबर २०१८