इतिहासात प्रथम २६ जुलै १७४५ मध्ये महिलांचा पहिला क्रिकेट सामना खेळला गेला. १८८७ साली प्रथमच यॉर्कशायरमध्ये महिला क्रिकेट क्लबचे नाव समोर आले. तीन वर्षानंतर इंग्लंडमध्ये पहिली महिलांची टीम बनली जिचे नामकरण इंग्लंड लेडी क्रिकेटर ठेवले गेले. ऑस्ट्रेलियात पहिली महिला क्रिकेट लीग १९८४ ला स्थापन झाली. १९५८ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेची स्थापना झाली, त्याचे मूळ उद्दिष्टच मुळी जगभरात महिला क्रिकेटचे इतर देशांशी समन्वय साधणे हे होते.
महिला क्रिकेटमध्ये आणखी सुधारणा होण्यासाठी २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेला आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत विलीन करण्यात आले. पहिली महिला कसोटी डिसेंबर १९३४ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघात खेळवण्यात आली. १९७३ पासून आजपर्यंत महिलांसाठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.
आज पर्यंत आठ वेळा महिला क्रिकेट विश्वकप आयोजित करण्यात आला आहे त्यात पाच वेळा ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ विश्व चॅम्पियन राहिला आहे. इंग्लंड संघ दोनदा आणि न्यूझीलंड संघ एकदा विश्व चॅम्पियन झाले आहेत.
भारतात क्रिकेट हा खेळ १६ व्या शकतात आला. पहिल्यांदा क्रिकेट १७२१ साली खेळल गेलं. १८४८ मध्ये मुंबईत पारशी समुदायाकडून पहिल्या क्रिकेट क्लबची स्थापना झाली. भारतीय संघाने १९३२ मध्ये इंग्लंड विरुद्ध आपली पहिली कसोटी खेळली. याच सुमारास जगात महिला क्रिकेट आपले स्थान पक्के करीत होती. भारतात महिला क्रिकेटची सुरवात १९७३ मध्ये झाली आणि त्याच वेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्थापना झाली. भारतीय महिला संघाने आपला पहिला सामना १९७६ मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध खेळला. आज पर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाने बरीच चांगली झेप घेतली आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply