आर्त तन हे, आर्त मन हे,
करुणानिधे,तुला साद रे,
शांती, प्रेम, आस्था,
गेल्या भावना कुठे रे,–!!!
उगा काळीज उलते,
मन किती धास्तावते,
का मम अंतरातुनी,
अस्वस्थपण छळते रे,–!!!
सांग तुझ्याविना माझा,
असेल कोण त्राता रे,
कोलाहल दाटे मनी,
ही जीवनाचीच करणी,
घायाळ हृदया, न वाली,
जावे कुठे,विधात्या रे,–!!!
सुखाची कशी वानवा असे,
दुःख, अमोज अगणित रे
जीवनाचेच गणित चुके,
ही भल्याभल्यांचीच कथा रे,–!!!
जे हवे ते मिळत नाही,
नको तेच वाट्यास येई,
जे मिळे,ते पुरत नाही,
समाधान मानावे कशात रे,–!!
प्रेम कुणालाच कळत नाही,
नात्यात विफलता येई,
ताणतणावां माप नाही,
जीव सदैव बेचैनी राही,
आधारच नच कोणी,
सांगू कोणा व्यथा रे,-!!
भोवताली माणसांचे रान,
वाटा वाकड्या, सुनसान,
जिवाची फक्त उलघाल, अंतरात्मा किती रडे रे,–!!!
शोधिते मी पहा तुला,
इकडून तिकडे, सगळीकडे,
कुठे असशी तू ,
कुठे का न दिसशी तू ,
आत,जीव कसानुसा रे,–!
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply