“अर्थ”
चांदण्याही विझलेल्या
चंद्रही जणू निजलेला
सावळले नभ सारे
गाती वाहते वारे
——————तू कुठे?!!१
थेंब थेंब शिडकावा
कुठूनसा हळु व्हावा
वाऱ्याच्या कुणी पाठी
झाडे का झिंगताती
———————तू कुठे?!!२
कसली ही झाली नशा
धुंद जशा दाही दिशा
पंखाविन तरल तनु
अवकाशी झेप जणु
———————तू कुठे?!!३
जिवनाचा अर्थ नवा
चराचरा उमगावा
या हळव्या क्षणी जरा
स्पर्श हवा प्रेमभरा
——————–तू कुठे?!!४
— ….. मी मानसी
Leave a Reply