कधीच प्रसिद्धीसाठी काम न करणारा अभिनेता म्हणून अरविंद स्वामी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जून १९७० रोजी झाला. कॉलेज करताना पॉकेटमनी म्हणून मॉडेलिंग करत असताना मणीरत्नम यांची नजर अरविंद स्वामी यांच्यावर पडली. मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद स्वामीने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. आणि एका रात्रीत अरविंद स्वामी स्टार बनले.
१९९५ मध्ये त्यांनी केलेल्या बॉम्बे चित्रपटानेही तुफान कमाई केली. यानंतरही त्यांनी चित्रपटाची वाट न धरता शिक्षण पूर्ण केले. चित्रपटात येण्याचे कधी ठरवले नसल्याने अरविंद पुढील शिक्षणासाठी विदेशात निघून गेले. अरविंद स्वामी यांनी २००० साली आलेला राजा को रानी से प्यार हो गया हा शेवटचा चित्रपट केला त्यानंतर २००८ पर्यंत अरविंद स्वामी यांनी एकही चित्रपट साईनही केला नाही.
मणीरत्नम यांनी अरविंदला पून्हा चित्रपचटात खेचून आणले आणि २०१३ मध्ये एक चित्रपट बनविला २०१५ साली मोहन राजा यांच्या थनी ओरुवन या चित्रपटात अरविंदने खलनायकाची भूमिका केली. अरविंद स्वामी यांनी १५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक तनुज भरमार यांच्या ‘डीअर डॅड’ चित्रपटातून पुनरागमन केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply