हा आंब्याच्या वृक्षा सारखा दिसणारा वृक्ष आहे.हा ८-१० मी उंच असून अशोक वृक्ष कायम हिरवागार असतो.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पानासारखीच दिसतात.ह्याची फुले दाट व गुच्छात येतात ती सुगंधी,आकर्षक व पिवळट तांबड्या रंगाची असतात.ह्याचे फळ ८-२६ सेंमी रूंद व ते चपट्या शेंगाच्या स्वरूपात असतात व ह्यात ४-८ चपट्या बिया असतात.
अशोकाचे उपयुक्तांग आहे त्वचा,बी,व फुल.अशोक चवीला तुरट,कडू असून तो थंड गुणाचा आहे.हा हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्त शामक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)अशोक उत्तम वेदनाशामक असल्याने वेदना असणाऱ्या भागांवर ह्याचा लेप करतात.
२)मुळव्याधी मध्ये रक्तस्त्राव होत असल्यास अशोक सालीचे चुर्ण उपयोगी आहे.
३)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांनी अशोक सालीचे चुर्ण तांदुळाच्या धुवणात देतात.
४)गरोदर स्त्रिने अशोक घृत सगर्भावस्थे मध्ये नियमीत घेतल्यास गर्भपात होण्याचा धोका टळतो.
५)अशोकाचे बी मुत्रल असल्याने मुत्रविकारात उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply