रत्नागिरी शहरातील आंबराई वरची आळी या भागात १८ हात असलेल्या गणपतीचे मंदिर असून महाराष्ट्रातीलच नव्हे जगात पहिलेच गणेश मंदिर आहे. १८ हात असलेली श्री गणेशमूर्ती फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. हे गणेशाचे मंदिर कै. विनायक कृष्ण जोशी यांनी स्वतःचे मालकीचे ठिकाणात स्वखर्चाने बांधले आहे. या मंदिरातील गणपतीचे नाव ‘श्री वीरलक्ष्मी धनुर्विद्या श्री वीर विघ्नेशा’ असे आहे. या गणपतीची उपासना श्री. जोशी यांनी कशी केली? गणपती केव्हा मिळाला? तसेच या उपासनेतून त्यांना कसा लाभ झाला इतर भक्तांना हे दैवत कसे पावते याचा वृत्तांत असा –
कै. विनायक जोशी हे १९४४ सालात राजापूर तालुक्यातील अ पोस्टात पोस्टमास्तर म्हणून काम करीत होते. त्यावेळी ३ मध्यप्रदेशातील इंदूर येथील कोटा संस्थानचे माजी स्थानिक कै. प.पू. अच्चुतानंदतीर्थ उर्फ भागवत स्वामी यांचे आगमन झाले स्वामींनी सर्व भारतभर प्रवास करून महालक्ष्मीची उपासना आपल्या सर्व भक्तांना दिली. परंतु कै. विनायकराव हे जन्मतःच गणपतीचे परमभक्त आहेत हे दैवी भक्तीने ठरवून महाराजांनी त्यांना या १८ हातांच्या गणपतीची उपासना दिली. हा कदाचित दैवी संकतेच असावा. याचा पडताळा विनायकरावांना पुढे जीवनात आलाच. त्यांनी १९४५ साली २१ दिवस श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे गणपतीच्या मंत्राचे जपानुष्ठान काहीही अन्न न घेता केले. २१व्या रात्री गणपतीचे दर्शन झाले. गणपतीने त्यांना फुलांचा प्रसाद दिला. साक्षात गणपतीचे दर्शन झाल्यावर जोशी रत्नागिरीला आले. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी या गणपतीच्या उपासनेला सुरुवात केली. या गणपतीचे नामाचा ३० लाखाहून अधिक जप झाल्यावर मार्गशीर्ष शु. ४ शके १८८८ सन १९६६ त्यांना दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतानुसार त्यांनी स्वतःचे राहाते ठिकाणात गणपतीचे छोटेसे मंदिर बांधून स्थानपा केली. ही मूर्ती त्यांनी जयपूरहून त्यावेळी एक हजार रुपये खर्चून आणली. आता या मंदिराला २० वर्षे पूर्ण झाली.
या मूर्तीचे वैशिष्ठ्य असे की ही मूर्ती अत्यंत देखणी पांढऱ्या संगमरवरी दगडाची २७ इंच उंचीची आहे. या पद्मासनस्थ गणपतीची सोंड सरळ असून याला १८ हात आहेत. याच्या प्रत्येक हातात वेगवेगळ्या प्रकारची आयुधे आहेत. ती १८ आयुधे अनुक्रमे उजवीकडील भागावरून १) कमळ २) परशु ३) पाश ४) चक्र ५) शक्ती ६) ऊस ७) वरदहस्त ८) माळ
९) ब्रह्ममंजली.
उजवीकडील भाग खालू १०) अभयहस्त ११) धनुष्य १२) कमंडलु १३) संपूर्ण मोदक पात्र १४) त्रिशुल १५) तामर १६) वज्र १७) ऊस १८) तलवार अशी असून हे मंत्र दैवत आहे. त्यामुळे मंदिरात अतिशय पावित्र्य राखावे लागते. या मंदिरातील गाभाऱ्यात पुजाऱ्याखेरीज अन्य कोणीही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. या मूर्तीसमोर अखंड नंदादीप तेवत असतो.
या मंगमूर्तीचा उत्सव दर वर्षीचे मार्गशीर्ष महिन्याचे शु.
प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत पाच दिवस चालतो. उत्सवाचे चवथे ा दिवशी म्हणजे चतुर्थीला दुपारी ‘श्री’ चा जन्म होतो. तसेच पंचमीला रात्रौ १२ नंतर लळीत होते. या व्यतिरिक्त आरत्या, भोवत्या छबीना, मोठमोठाले याग, सहस्त्रचंड्या, वक्त्यांची प्रवचने, कीर्तने इ. धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. अशा प्रकारचे जागृत देवस्थान हे रत्नागिरीचे भूषण आहे. या गणपतीचा मंत्र खालील प्रमाणे
ॐ श्री वरवरद मूर्तेय वीर विघ्नेशाय नमः ।।
या गणपतीचे १८ हात हे लक्ष्मीचे असून अवतार गणपतीचा आहे. तसेच हा गणपती नवसाला पावतो. या देवतेच्या उपासनेमुळे कुलवृद्धी, भूत-प्रेतबाधा यांचा नाश, व्याधींचा नाश, थ शत्रूंचा नाश, विद्याप्राप्ती, मनातील इच्छा पूर्ण करणे, कफवात, या पित्त, ज्वर इ. नाश करणारे असे आहे. या १८ हात गणपतीला ८ नेहमी पाच नारळ आणि गूळ असाच नवस बोलला जातो.
-मंजिरी दांडेकर, ठाणे
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०२१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply