‘तुफान मेल’ हे नाव आमच्या लहानपणापासून नेहमी कानांवर पडत असे. अशा नावाची एखादी गाडी होती की नव्हती हे मला माहीत नाही, परंतु काही वेळा एखाद्या व्यक्तीला विशेषण म्हणून ‘तुफान मेल’ असं संबोधिलं जात असे. गाडीला नाव देताना, बहुधा ज्या स्टेशनवरून गाडी सुटे व ज्या स्टेशनावर शेवटी थांबे त्या स्टेशनांची नावं दिली जाण्याचा एक प्रघात होता. मुंबई-मद्रास मेल, मुंबई-अमृतसर एक्सप्रेस, अशी नावं या प्रघातातूनच देण्यात आली.
आज मात्र बऱ्याच गाड्यांना अतिशय आकर्षक नावं दिली जातात. यासाठी जनतेकडून अपेक्षित नावं मागवली जातात. जनतेकडून नावं आल्यावर त्यावर रेल्वे बोर्ड विचार करतं आणि त्यानंतर गाडीचं नाव पक्कं केलं जातं. गाडी स्टेशनवरून निघताना व स्टेशनात शिरताना त्या नावाची घोषणा झाली, की गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. एखाद्या प्रदेशातील ते प्रचलित वैशिष्ट्यपूर्ण नावही असू शकते. उदाहरणार्थ, (मुंबई-अमृतसर ह्या गाडीचे नाव तेथील सुप्रसिद्ध सुवर्ण मंदिरा रेल्वे टाईमटेबलमध्ये अशी खास नावं असलेल्या अनेक गाड्या आहेत. (गोल्डन टेंपल) मुळे ‘गोल्डन टेम्पल मेल’ दिलं गेलं.
रेल्वे टाईमटेबलमध्ये अशी खास नावं असलेल्या अनेक गाड्या आहेत. त्यांतील काही गाड्यांची नावं उचित व श्रवणीय वाटतात. त्या नावांमधून त्यांची विशेषता जाणवते. उदाहरणार्थ,
नाव व प्रवासमार्ग
१. गीतांजली एक्सप्रेस – मुंबई-कलकत्ता
२. विवेक एक्सप्रेस – कन्याकुमारी दिब्रुगड
३. महाराज एक्सप्रेस – (पॅलेस ऑन व्हील्स) दिल्ली-आग्रा-राजस्थान
४. विश्वनाथ एक्सप्रेस – वाराणसी-दिल्ली
५. जिम कॉर्बेट एक्सप्रेस – दिल्ली-रामनगर-काठगोदाम
६. मत्स्यगंधा एक्सप्रेस – मुंबई-मंगलोर-कोकणमार्गे
७. कोकणकन्या एक्सप्रेस – मुंबई-मडगाव (गोवा)
८. महालक्ष्मी एक्सप्रेस – मुंबई-कोल्हापूर
९. इंद्रायणी एक्सप्रेस – मुंबई-पुणे-सोलापूर
१०. सिंहगड एक्सप्रेस – मुंबई-पुणे
११. सिद्धेश्वर एक्सप्रेस – मुंबई-सोलापूर
१२. पंचवटी एक्सप्रेस – मुंबई-नाशिक-मनमाड
१३. तुलसी एक्सप्रेस – मुंबई-अलाहाबाद
१४. झेलम एक्सप्रेस – पुणे-जम्मू-तावी
१५. चंबळ एक्सप्रेस – हावरा-ग्वाल्हेर
१६. महाबोधी एक्सप्रेस – गया-दिल्ली
१७. शाने पंजाब – अमृतसर-दिल्ली
१८. कोणार्क – मुंबई-भुवनेश्वर
१९. हिमगिरी – कन्याकुमारी-जम्मू-तावी
२०. अहिंसा – पुणे-अहमदाबाद
२१. गोदान – लोकमान्य टिळक – गोरखपूर
२२. हुसेन सागर – मुंबई-हैदराबाद
२३. सोमनाथ अहमदाबाद-वेरावळ (गुजरात)
२४. शरावती – मुंबई-म्हैसूर
२५. अकालतख्त – अमृतसर-सिआलडा (कलकत्ता)
२६. कामरूप – हावरा-दिब्रुगड
२७. सूर्यनगरी – जोधपूर-ब्रांदा (मुंबई)
२८. फलुकनामा – हावरा-सिकंदराबाद
२९. चेतक – सराई रोहिल्ला (दिल्ली) – उदयपूर
३०. महाकोशल – जबलपूर – हजरत निजामउद्दीन
३१. ज्ञानेश्वरी एक्सप्रेस – लोकमान्य टिळक, मुंबई-कलकत्ता –
३२. दुरान्तो एक्सप्रेस – “दुरान्तो म्हणजे ‘न थांबता धावणाऱ्या’ रेल्वेगाड्या.
दुरान्तो”, या नावानं अनेक गाड्या मुंबई-नागपूर, मुंबई-कलकत्ता, कलकत्ता-दिल्ली असा प्रवास करतात. या गाड्यांना मध्ये कुठेही थांबा नाही.
३३. गोल्डन टेंपल मेल – मुंबई ते अमृतसर
३४. ब्रह्मपुत्रा मेल – दिल्ली-दिब्रुगड
३५. पर्ल एक्सप्रेस – तुतिकोरीन (थुथुकडी) ते चेन्नई (तुतिकोरीन येथील जगप्रसिद्ध ओरिएंट पर्लस्)
३६. ब्लॅक डायमंड एक्सप्रेस – कलकत्ता ते धनबाद (झारखंड)
-डॉ. अविनाश वैद्य
आकर्षक नावं, आलिशान गाड्या आणि टॉय ट्रेन्स
Leave a Reply