आंबेडकरी जाणिवेतून लिहिणारे मराठीतले नामवंत लेखक केशव मेश्राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला.
कथा, कादंबरी, कविता, ललित तसंच वैचारिक अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमधे त्यांनी लेखन केलं. २००५ मधे नाशिक इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं.
१९७७ मधे ‘उत्खनन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. रेल्वेत नोकरीला असलेले मेश्राम नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
जुगलबंदी, अकस्मात, चरित हे कवितासंग्रह, पोखरण, हकिकत, जटायू या कादंबऱ्या आणि खरवड, पत्रावळ, धगाडा, गाळ आणि आभाळ, मरणमाळा, आमनेसामने, कोळीष्टके, ज्वालाकल्लोळ, खांडववन हे त्यांचे कथासंग्रह गाजले.
‘अक्षरभाकिते’ या संग्रहात दलित संकल्पनेची फेरमांडणी आणि नामांतरानंतरच्या चळवळीचे स्वरूप याविषयीचं लेखन आहे.
केशव मेश्राम यांचे ३ डिसेंबर २००७ रोजी निधन झालं.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply