नवीन लेखन...

लुटीचे नवे साधन

खासगीकरणातून बांधण्यात आलेल्या विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या अन्याय्य टोलवसुलीच्या विरोधात आता वाहनधारकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या विषयाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुदत संपून गेल्यानंतरही टोलवसुली सुरू असल्याचे प्रकार यापुर्वी उघडकीस आले आहेत. त्यामुळे जनतेच्या आर्थिक लुटीचे नवे साधन बनलेल्या टोलबाबत सरकार फेरविचार करणार का हा खरा प्रश्न आहे.
[…]

न्यायव्यवस्थेला नवा हादरा

गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराची चर्चा मोठ्या प्रमाणात गाजते आहे. कधी न्यायमूर्तींनी आपली संपत्ती घोषित करण्यावरून तर कधी एखाद्या न्यायमूर्तींकडे बेहिशेबी संपत्ती असल्याचे आरोप होतात. या बातम्यांमुळे जनमत बिघडत असतानाच देशाचे माजी कायदेमंत्री अनेक न्यायाधिश भ्रष्ट असल्याची माहिती देऊन प्रतिज्ञापत्र दाखल करतात, तेव्हा एकूणच व्यवस्थेला हादरा बसल्याशिवाय राहत नाही.
[…]

अपघातांची मालिका कधी संपणार ?

ताज्या रस्ते अपघातांमध्ये ‘सारेगामापा’ स्पर्धेतील लक्षवेधी गायक राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रितम मते असे अनेक मान्यवर जखमी पडले. गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यात रस्ते अपघातात अनेकांनी प्राण गमावले. अशा अपघातांना रस्त्यांची दुरवस्था, चालकांचा बेदरकारपणा कारणीभूत ठरत असला तरी अपघात टाळण्यासाठी प्रशासन फारसे काही करत नाही हेही खरेच. ही परिस्थिती कधी बदलणार? […]

वेध पाश्चात्य कृषी तंत्रज्ञानाचा

राज्यात उसाच्या लागवडक्षत्रात वरचेवर वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन कारखान्यांना गाळपाचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचबरोबर सरकारने लेव्ही रद्द करणे, साखरेच्या निर्यातीसाठी पावले उचलणे आदी प्रयत्नांवर भर द्यायला हवा. शेतकंर्‍यांनीही प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन उत्पादनखर्चात बचत करायला हवी. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील शेतकर्‍यांनी ब्राझीलमधील शेतीचे तंत्र समजून घ्यायला हवे. […]

“कॉपीराईट” कायद्यावर नव्याने प्रकाश

‘ख्यातनाम साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या साहित्याच्या प्रकाशनाचे, विक्रीचे अधिकार कोणाकडे असावेत याविषयी त्यांचे वारसदार आणि देशमुख आणि कंपनी यांच्यात काही वर्षांपासून वाद होता. सर्वोच्च न्यायालयाने हे अधिकार खांडेकरांच्याच वारसांकडे कायम राहणार असल्याचे जाहीर केल्याने या वादावर पडदा पडला. या निमित्ताने कॉपीराईट कायद्यातील तरतुदींवर नव्याने प्रकाश पडला आहे. त्यानिमित्ताने…
[…]

तरुण येतील पण घराणेशाहीचे काय ?

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच महाराष्ट्रातील काही शहरांना भेटी देऊन तरुणांशी संवाद साधला. यावेळी तरुणांनी अधिक संख्येने राजकारणात यावे असे सांगण्यास ते विसरले नाहीत. वास्तविक अलीकडे प्रत्येक राजकीय पक्षात तरुणांची अधिक भरती होत आहे. पण घराणेशाहीमुळे या तरुणांना मोठी संधी प्राप्त होत नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी स्वत:च्या वक्तव्यावर आत्मपरिक्षण करायला हवे आहे. […]

बिहारमध्ये राजकारण्यांची सत्त्वपरीक्षा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून रणमैदान गाजायला लागले आहे. लालू यादव-रामविलास पासवान यांची आघाडी, नितीशकुमार-भाजपची युती आणि काँग्रेस या तीन मुख्य स्पर्धकांमुळे बिहारचे निवडणूक समर गाजणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार रूप पालटत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि दीर्घकालीन परिणाम करणारी ठरणार आहे.
[…]

परप्रकाशी ‘स्वयं’सेवी संस्था !

देशात ३३ लाख स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्या तरी या संस्थांनी नफा कमावू नये या मूळ उद्देशालाच हरताळ फासलेला दिसून येतो. काही संस्था निःस्पृहपणे काम करत असल्या तरी अनेक संस्था कर वाचवणे, प्रवर्तकांसाठी सुविधा निर्माण करणे,शासनाचा निधी उकळणे अशा कामांसाठीच स्थापन केल्या जातात. या संस्थांनी खरोखरच काम केले तर देशापुढील अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील. […]

फंडा ब्रँड एंडोर्समेंटचा

टीव्ही लावला की प्रत्येक वाहिनीवर एखादा तरी लोकप्रिय कलाकार किवा क्रिकेटपटू विशिष्ट ब्रँडची जाहिरात करताना दिसतो. सेलिब्रिटीजची हीच प्रसिद्धी उत्पादन लोकप्रिय करते. ब्रँड एंडोर्समेंटमध्ये कलाकारांची अटीतटीची स्पर्धा सुरू असते. अशा जाहिरातबाजीचा फंडा अर्थविश्वात अनेक तरंग उमटवत असून त्यातून भले मोठे अर्थकारण आकाराला आले आहे. वलयांकित व्यक्तिमत्वाच्या या अर्थकारणाचा खास वेध.
[…]

गरज दोघांच्याही आत्मपरिक्षणाची

मराठी चित्रपटनिर्मितीचा वेग वाढत असतानाच आवश्यक त्या प्रमाणात चित्रपटगृहे उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली जाते.

मुख्यतः मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट ‘प्राईम टाईम’मध्ये प्रदर्शित केले जावेत अशी निर्मात्यांची अपेक्षा असते. मात्र, याबाबत

मल्टीप्लेक्सचालक सहकार्य करत नाहीत, असा सर्वसाधारण सूर आहे. या परिस्थितीत मल्टीप्लेक्सचालक आणि निर्माते या दोघांचेही आत्मपरिक्षण गरजेचे ठरते. […]

1 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..