दोन मनें दे प्रभू
इच्छा आहे प्रभू , तुझ्या नामस्मरणाची ऐकून घे कहाणी, अडचणींची ।। नाम घ्यावे मुखीं, एकचित्ताने सार्थक होईल तेव्हां तप:साधने ।। संसार पाठी, लावलास तूं गुरफटून त्यांत, साध्य न होई हेतू ।। मला पाहिजे दोन्हीं, संसार नि ईश्वर एकात गुंततां मन, दुसरे न होई साकार ।। दे प्रभू ,मनाची एक जोडी संसारांत राहून , घेईन प्रभूत गोडी […]