आपणच असतो विठ्ठल आणि आपणच रुक्मिणी…!
सकाळ उजाडली. विठ्ठल अजून झोपलाच होता. एकादशी आळसाच्या पांघरुणात गुरफटली होती. बाहेर पाऊस पडत होता मस्तंपैकी… आणि तेवढ्यात ढोल ताशांचा आवाज कानावर पडला. विठ्ठल ताडकन उठला. आजी बसलेली बाजूला… ‘ढोल ताशे का वाजताहेत?’, त्याने आजीस विचारले. आजी म्हणाली, ‘आज आषाढी एकादशी नाही का… सकाळी शाळेतल्या मुली नव्वारी नेसून नटून थटून गेल्या इथून… आणि आमचा विठ्ठल अजून […]