सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करित करित
लक्ष्य तयांचे फूलपाखरू, फुलाभोवती होते खेळत….१
भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी
शोषीत असता गंध फुलांतील, चंचल होते नजर ठेवूनी….२
व्याघ्र मावशी मनी ही राणी, म्याँव म्याँव म्याँव करित आली
उंदीर मामा दिसत तिजला, झेप घेण्या टपून बसली…३
शंका येता त्याला किंचीत, झर् झर् झर् तो बिळात गेला
केवळ चित्त सावध असतां, प्राण आपले वाचवू शकला…४
निसर्ग देतो कला आगळी, बचाव करण्या शत्रू पासूनी
सावध असतां जीव जीवाणू, मारू न शकते त्याला कुणी….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply