।।लंबोदराय नम: बदरीपत्रं समर्पयामि।।
उन्हाळयात प्रचंड प्रमाणात मिळणारी हि आंबट गोड रान फळे गणेशाला देखील हि वनस्पती प्रिय आहे म्हणूनच पत्री मध्ये हिला गजाननास अर्पण करतात.हिच्यात बरेच औषधी गुण देखील असतात.
ह्याचे मध्यम उंचीचे काटेरी झाड असते.ह्याची त्वचा धुरकट रंगाची फाटलेली असते.पानांच्या कडा दंतुर असतात व पृष्ठ भाग खरखरीत लव युक्त असतो.
ह्याचे उपयुक्तांग फळे व पाने अाहेत.आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊया.ह्याची चव गोड,आंबट,तुरट असून ती थंड गुणाची असतात व पचायला जड असतात.हि स्निग्ध व पिच्छील असतात.
हि वात व पित्त दोष कमी करतात.
आता ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊया:
ह्याची पाने दाहशामक व जखम भरून काढायला उपयुक्त आहेत.तसेच गळू पिकायला उपयुक्त आहेत.
बोर फळे भुक वाढविणारी,पाचक,वात व मल ह्याचे सुलभ निस्सरण करतात.
बोर फळे तृष्णाशामक असून तहान भागवतात.
हृदयाला बलकारक आहेत.
पानांचा उपयोग डायबेटीस मध्ये होतो कारण ह्यात होणारी अतिमुत्रप्रवृत्ती ह्याने कमी होते.
बायकांच्या अंगावर पांढरे अथवा मासिकपाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होत असल्यास वाळवलेली बोरे उपयुक्त ठरतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply