नवीन लेखन...

देवरुख मधील ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक वसंत उर्फ बाळासाहेब पित्रे

बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या अनेक वर्षात निर्माण झाले होते. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२८ रोजी झाला. वसंत मनोहर उर्फ बाळासाहेब पित्रे यांनी हिंदुस्थान लिव्हर, टाटा यांच्या सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये आधी मानव संसाधन क्षेत्रात ज्येष्ठ पदावर काम केले होते. देवरुख येथील जगप्रसिद्ध सुश्रुत-अॅडलर या ओर्थोपेडिक शल्य चिकित्सा उपकरणे तयार करणाऱ्या नामांकित कंपनीचे ते संस्थापक संचालक होते. बाळासाहेब पित्रे यांनी ४० वर्षांपूर्वी ऑर्थोपेडिक ऑपरेशनसाठी लागणाऱ्या स्टील इन्सर्टची निर्मिती सुरू केली. त्या वेळी कोकणात रस्ते, वीज यांचा पुरवठा नसताना आपला कारखाना सुरू केला आणि तो यशस्वी करून दाखवला. त्यांचे चिरंजीव अजय पित्रे यांनी हाच वारसा पुढे चालू ठेवत देवरूख इथे Export Oriented Unit(EOU) सुरू करून कोकणवासीयांचा चांगला रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

बाळासाहेब पित्रे यांनी १९७३ पासून सुश्रुत कंपनीच्या कारभाराची सूत्रे सांभाळत त्यांनी अनेक सामाजिक कार्यातही आपला सहयोग दिला. बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या पावशतकात निर्माण झाले होते. सांस्कृतिक आणि कला क्षेत्राची देवरुखकरांची भूक या उद्योगाच्या पाठबळावर सुरू झालेल्या बाळासाहेब पित्रे यांच्या पित्रे ट्रस्ट आणि अन्य संस्थांनी भागविली आहे. बाळासाहेब पित्रे यांनी सिद्धी ट्रस्ट, सेंटर फॉर रुरल आंतर्प्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट अँड रिसर्च (CREDAR),देवरुख ललित कला अॅकॅडमी, आकार ऑर्गनायझेशन, अशा विविध माध्यमात कार्यरत सामाजिक संस्थांची स्थापना करून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनाही सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन केले होते.

देवरुख मधील अग्रगण्य अशा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचेही ते मानद अध्यक्ष होते. स्व. लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालयाची निर्मिती बाळासाहेब पित्रे यांच्या पुढाकाराने झाली. जुन्याजाणत्या कलावंतांच्या अजरामर कलाकृतींचे सर्वात मोठे संकलन असणारे हे मुंबईबाहेरील एकमेव कलासंग्रहालय आहे. बाळासाहेब पित्रे यांनी स्थापन केलेल्या “सिध्दी ट्रस्ट”द्वारा सन १९८०पासून विकासाचे अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत. सिध्दी ट्रस्टतर्फे “शालेय परिसर विकास प्रकल्प” या प्रकल्पाची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर १९८८-८९मध्ये करण्यात आली. त्यांच्या ‘क्रेडार’ या संस्थेच्या स्थापनेतून डी-कॅड (देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयात चित्रकला, हस्तकला, पेपर क्राफ्ट, पेपर मॅश, स्क्रीन प्रिंटिंगसह कलाविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात.

हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंची विक्रीही तेथे होते. देवरूखमधील नाट्यगृहाची कमतरता लक्षात घेऊन बाळासाहेब पित्रे प्रायोगिक कलामंच त्यांनी स्थापन केला. तेथे संगीत, सांस्कृतिक महोत्सव, व्यावसायिक नाट्यप्रयोग होतात. त्यांच्या कामाच्या पद्धतीने आणि सृजनशील वृत्तीने त्यांनी औद्योगिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याकार्तुत्वाने ठसा उमटवला होता. बाळासाहेब पित्रे यांच्या पत्नी सौ. विमलताई पित्रे यांचे ६ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले होते. मी त्यांना दोन वर्षा पुर्वी भेटलो होतो तेव्हा मला त्यांची उद्याेजक व कलावंत अशी दोन्ही रुपे बघण्यास मिळाली होती. या वयात सुध्दा त्यांचा कामाचा झपाटा बघण्यासारखा होता. बाळासाहेब पित्रे यांचे १२ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..