नवीन लेखन...

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व

Balgandharva

प्र.के अत्रे म्हणत असत “बालगंधर्व…..फक्त पांचच अक्षरे……पण महाराष्टाचे पंचप्राण ह्या अक्षरात गुंतले आहेत. त्यांचा जन्म २६ जून, १८८८ रोजी झाला. लोण्यात जशी खडीसाखर विरघळते त्याप्रमाणे “बालगंधर्व” ही अक्षरे मराठी मनात विरघळतात.

बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. बालगंधर्वांनी कंपनीतील सर्वांना चांदीच्या थाळीतून वरण-भात तूप आणि पक्वान्नं खाऊ घातली, त्यांनाच आंधळ्या प्रेमापोटी जर्मनच्या थाळीतून जेमतेम अर्धी भाकरी अन्‌ मूठभर भात खाण्याची वेळ यावी, यापरता दैवदुर्विलास कोणता? मोत्यांचा चारा खाऊन जगणाऱ्या “राजहंसा‘वर अशी वेळ आली, ती निव्वळ अव्यवहारीपणा, आंधळं प्रेम अन्‌ व्यक्तिगत अवगुणांमुळं, असं आचार्य प्र. के. अत्रे, गंधर्व कंपनीतील हीरो-कृष्णराव चोणकर आणि विनायकराव पटवर्धन-यांनी लिहून ठेवलंय…अन्‌ तरीही अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं “असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न होतं. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी त्यांचं यथार्थ वर्णन केलंय…
जशा जन्मती तेज घेऊन तारा । जसा मोर घेऊन येतो पिसारा ।
तसा येइ कंठात घेऊन गाणे ।
असा बालगंधर्व आता न होणे ।।
रतीचे जया रूपलावण्य लाभे ।
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे ।
सुधेसारखा साद; स्वर्गीय गाणे।
असा बालगंधर्व आता न होणे ।।

अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं “असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!

बालवयातच लोकमान्य टिळकांकडून मिळालेली “बालगंधर्व‘ ही उपाधी, १९०५ मध्ये झालेला “किर्लोस्कर नाटक मंडळी‘तील प्रवेश, त्यानंतर छत्रपती शाहूमहाराजांनी दिलेला उजव्या अधू कानाच्या ऑपरेशनचा सल्ला, १९१२ मध्ये झालेली “गंधर्व नाटक मंडळी‘ची स्थापना, १९१९ मध्ये कंपनीची एकट्याकडं मालकी, केशवराव भोसले यांच्याबरोबर झालेला १९२१ मधील “संयुक्त मानापमान‘चा प्रयोग, त्या काळात झालेलं एक ते दीड लाखाचं कर्ज, १९२८ पर्यंत त्यांनी केलेली साडेतीन लाखांची परतफेड…अन्‌ १९३० नंतर त्यांना लागलेली उतरण…असे हे बालगंधर्व यांच्या जीवनातील काही टप्पे…

बालगंधर्व यांचे १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..