तुका म्हणे सुख घेतलें गोपाळी । नाचती कांबळी करुनि ध्वजा ॥१॥
करूनिया टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥
दगडाचे टाळ कोण त्याचा नाद । गीत गाता छंद ताल नाही ॥३॥
ताल नाही गातां नाचतां गोपाळा । घननीळ सावळा तयामध्ये ॥४॥
मध्ये जया हरि ते सुख आगळे । देहभाव काळे नाही तया ॥५॥
तयांसि आळंगी आपुलिया करी । जाती भूमीवरी लोटांगणी ॥६॥
निजभाव देखे जयाचिये अंगी । तुका म्हणे संगी क्रीडे तया ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply