भाव दावी शुध्द देखोनियां चित्त । आपल्या अंकिता निजदासां ॥१॥
सांगे गोपाळांसी काय पुण्य होते । वाचलो जळते आगीहातीं ॥२॥
आजी आम्हां येथें वांचविलें देवे । नाही तरी जीवे न वांचतो ॥३॥
न वांचत्या गाई जळतों सकळें । पूर्वपुण्यबळे वाचविलें ॥४॥
पूर्वपुण्य होते तुमचियां गांठी । बोले जगजेठी गोपाळांसी ॥५॥
गोपाळांसी म्हणे वैकुंठनायक । भले तुम्ही एक पुण्यवंत ॥६॥
करी तुका म्हणे करवी आपण । द्यावे थोरपण सेवकांसी ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply