मजेदार वाटत असती, भावंडांची बघून भांडणें
‘मला पाहीजे जास्त’, हेच मुख्य मागणें
इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार
दांत ओठ खाऊनी, रागव्यक्त होणार
क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें
दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें
राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं
स्वार्थतेचा अभाव दिसे, शत्रु येथे नसे कुणी
बालपणीच्या प्रेमामध्यें, थोडे भांडणें परवडते
चव येण्या पदार्थाला, तिखटमिठ लागते
लहान असतां भांडून घ्या, तेच वय भांडणाचे
मोठे होऊन आठवाल, रम्य दिवस ते बालपणाचे
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply