|| हरि ॐ ||
आज सरकार मुंबईचे शांघाय करण्याचा घाट घालीत आहे पण मुंबईत राहणाऱ्या काही नागरिकांच्या व सतत येणाऱ्या लोंढ्यांच्या नसानसात भिनलेला अस्वच्छतेचा निचरा कोण करणार? नागरिकांच्या मानसिकतेवर रत्यांची तसेच सार्वजनीक वाहानांची व ठिकाणांची स्वच्छता अवलंबून असते.
स्वतंत्र भारताचे मंत्री,
पुढारी व सुजाण नागरिक देशाच्या प्रमुख कार्यक्रमांच्या वेळेस सार्वजनीक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या आणि कश्याकश्याच्या शपथा घेतात. समारंभ झाल्याझाल्या मंत्रीच रस्त्याच्या बाजूला पण तंबाखू किंवा गुटख्याची पिचकारी मारून शपथेला हरताळ फसताना आपण बघतो. निवडणुकींच्या वेळी शपथेवर दिलेली आश्वासने जशी सोईस्कररीत्या विसरली जातात तसेच हे. “गरज सरो आणि वैद्य मरो”.
शांघायचा ट्रेलर म्हणून म्हंणा किंवा नवीन उपाय म्हणून आता मेट्रो रेल्वे व मोनो (स्काय) रेल्वे अस्तित्वात येणार आहे. (मध्यंतरी आपण बघितलेच की तो मार्ग करताना कसा अपघात झाला तो). एकंदर स्वच्छतेचे मान पाहता ए.सी. डब्यातून बिचाऱ्या पान व गुटखा खाणाऱ्या प्रवाश्यांना खिडक्यांतून पिचकाऱ्या मारता येणार नाहीत. मग सवयी प्रमाणे कचरा कोपऱ्यांत किंवा सीटच्या खाली टाकतील व थुंकतील यासाठी आधीच शांघाय टाइप बंदोबस्त करावा. हेच नागरिक जेंव्हा परदेशात जातात तेंव्हा रेल्वे, बस, विमान, सार्वजनीक ठिकाण, वाहनात व रात्यात थुंकत व पानाच्या पिचकाऱ्या मारत नाहीत. सिगारेटची थोटक टाकत नाहीत. का? भारताची लाज राखता? का दंड डॉलरमध्ये द्यावा लागतो आणि शिक्षेचि भिती वाटते म्हणून? भारतात रत्यावर, वाहनात व सार्वजनीक ठिकाणी दुसरा अस्वच्छता करतो म्हणून मलाही तेवढाच हक्क आहे असे जे समजतात त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. अश्याने हा प्रश्न सुटणार नाही तर प्रत्येकाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. माझा, माझ्या देशावरील असलेल्या निस्सीम प्रेमाचा, अस्मितेचा, अभिमानाचा व कर्तव्याच्या जाणीवेचा भाग आहे.
गर्वाने माझा, आपला देश म्हणवणार्यांनी देशातील सार्वजनीक वाहने आपली वाटतात का? का त्या केराच्या टोपल्या व पिकदाण्या वाटतात? माझा परिसर, सार्वजनीक वाहने, रस्ते व उद्याने स्वच्छ व सुंदर राखण्याची भारताचे सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी व कर्तव्य नाही का? का सर्वच प्रश्न शासन व पालिका यांनी कायद्याने सोडवायचे?
काही शिकलेली शुशिक्षित? प्रवासी चांगले संस्कार असून आळस व वाईट सवयींना बळी पडल्याने असे वागतात. तर काही जाणून बुजून करतात. त्यापेक्षा खेडेगावातील आडाणी व अशिक्षित माणसे बरी ज्यांना गाव स्वच्छ ठेवण्याचे महत्व कळले व त्याबद्दल शासनाचा पुरस्कार व सन्मानही मिळाला. ही खरी त्यांची गावाच्या स्वच्छतेबद्दल कळकळ, आस्था आणि देशप्रेम. सार्वजनीक वाहने, रस्ते व उद्याने माझ्या देशाची संपत्ती आहे ती स्वच्छ व सुरक्षित ठेवणे माझे देशाप्रती कर्तव्य आहे असे जोपर्यंत भारतातील प्रत्येक नागरिकाला वाटत नाही तो पर्यंत असेच चाल्लाणार. मानसिकता कोणी कोणाची बदलायची? परंतू हे बदलणे गरजेचे आहे तरच ही परिस्थिती सुधारेल.
<श्री. अण्णा हजारेंना राळेगणसिद्धी मधील गावकऱ्यांना स्वच्छतेचे व त्या अनुषंगाने आरोग्याचे महत्व पटवून देता आले. गावकरी जरी अशिक्षित व अडाणी होते पण त्यांना फुकटचा गर्व व शिक्षणाची घमेंड नव्हती. म्हणून तर अजून अति शिकलेल्या राजकारण्यांना भ्रष्टाचाराच्या लोकपाल विध्येयाकाचे महत्व पटले नाही किंवा पटवून घ्यायचे नाही.
<काही नागरिकांचे देशाप्रती खरेखुरे, निस्सीम, लाभेवीण प्रेम असते आणि दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी प्यायची सवय जडली नसती तर भारतात कधीच बॉम्बस्फोट झालेच नसते व होणार नाहीत.
आशा करुया की येणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी व्यसनाधीन नागरिक शपथेवर सर्व व्यसने सोडण्याचा निर्धार करून व ती आचरणात आणून सर्वच प्रश्न निकालात काढतील आणि अस्वच्छतेचे स्वच्छतेत आणि व्यासंनांचे चांगल्या सवयीत रुपांतर करतील. जय मुंबई जय भरत !
<जगदीश पटवर्धन
<वझिरा, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply